संशोधकांच्या संशोधनाचा उपयोग सामान्यांसाठी : केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन

संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग सामान्य जनतेला व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. हे प्रयत्न अधिक जोमाने सरू ठेवण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी गोव्यात दिली.

PTI | Updated: Jul 13, 2015, 11:46 AM IST
संशोधकांच्या संशोधनाचा उपयोग सामान्यांसाठी : केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन title=

पणजी : संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग सामान्य जनतेला व्हावा यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. हे प्रयत्न अधिक जोमाने सरू ठेवण्यात येतील, अशी ग्वाही केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी गोव्यात दिली.

३९ देशांचा सहभाग असलेल्या बाराव्या आंतरराष्ट्रीय अंटार्टिक अर्थ सायन्सच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. गेली पस्तीस वर्षं भारत अंटार्टिकावरती निरंतन संशोधन करतोय. सध्या अंटार्टिकावर जगभरातले ३९ देश संशोधन करताहेत. 

या देशांतल्या संशोधकांचा परस्पर संवाद वाढावा आणि अंटार्टिकावरील संशोधनाला गती मिळावी याकरता, बारावी आंतरराष्ट्रीय अंटार्टिक अर्थ सायन्स परिषद भरवण्यात आली आहे. या परिषदेत अंटार्टिकावर काम करणारे सुमारे ८० संशोधक सहभागी झाले आहेत. शुक्रवारपर्यंत चालणाऱ्या या परिषदते विविध विषयांवर चर्चा होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.