हो सोशल मीडियावर फिरणारे फोटो खरे! गोव्याच्या बीचवर 'मगर'

जर आपण गोव्याला फिरायला जायचा प्लान बनवत असाल तर ही बातमी नक्की वाचा... सध्या सोशल मीडियावर गोव्याच्या बीचवर मगर फिरत असल्याचा फोटो वायरल झालाय. हा फोटो खरा असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

PTI | Updated: Jul 17, 2015, 02:20 PM IST
हो सोशल मीडियावर फिरणारे फोटो खरे! गोव्याच्या बीचवर 'मगर' title=

पणजी: जर आपण गोव्याला फिरायला जायचा प्लान बनवत असाल तर ही बातमी नक्की वाचा... सध्या सोशल मीडियावर गोव्याच्या बीचवर मगर फिरत असल्याचा फोटो वायरल झालाय. हा फोटो खरा असल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

पणजीपासून ३० किलोमीटरवर असलेल्या मोरजिम बीचवर मगर फिरत असल्याचा फोटो तिथले स्थानिक निलेश बगकर यांनी काढला होता. वनविभागाचे डी.एन.एफ. कार्वेलो यांनी हे खरं असल्याचं सांगितलंय. 

निलेश यांनी दिलेल्या माहितीनुसार समुद्रकिनारी काही कुत्रे मगरीच्या मागे लागले होते. तेव्हा त्यांनी हा फोटो काढला. मोरजिम बीच टर्टल बीच म्हणूनही प्रसिद्ध आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.