पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, पंजाब प्रांताचे गृहमंत्री खानजादा यांचा मृत्यू

पाकिस्तानातील अटक इथं आत्मघाती हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री कर्नल शूजा खानजादा यांचा मृत्यू झालाय. ते ७१ वर्षांचे होते. खानजादा यांच्या कार्यालयात बैठक सुरू असतांना हा स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. 

PTI | Updated: Aug 16, 2015, 11:14 PM IST
पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, पंजाब प्रांताचे गृहमंत्री खानजादा यांचा मृत्यू title=
photo courtesy : Geo News

लाहोर: पाकिस्तानातील अटक इथं आत्मघाती हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे गृहमंत्री कर्नल शूजा खानजादा यांचा मृत्यू झालाय. ते ७१ वर्षांचे होते. खानजादा यांच्या कार्यालयात बैठक सुरू असतांना हा स्फोट झाला. या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. 

शूजा खानजादा यांनी लष्करातील निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश केला होता.  गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातच त्यांची पंजाब प्रांताचे गृहमंत्री म्हणून निवड झाली होती. शूजा यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक पावलं उचलली होती. त्यामुळं 'लष्कर-ए-झांग्वी' सारख्या संघटनांनी त्यांना विरोध दर्शवला होता. 

या स्फोटात गृहमंत्री कार्यालयाचं छप्पर कोसळलं. त्यात चौघांचा मृत्यू झाला तर इतर जण जखमी झालेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.