10
10
दिल्ली निवडणुकीत भाजपला जोरदार दणका दिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल टीका करण्याची एकही संधी वाया दवडत नाही. त्यांनी जेएनयु वादावर भाष्य करताना उपरोधिक टीका केलेय, आता भाजप आणि संघावर टीका करणे किंवा बोलणे म्हणजे गुन्हा आहे.
मदानायाकनहल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. स्टील घेऊन जाणारा ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्याने हा अपघात आज पहाटे झाला.
केंद्र सरकार देशातील सात राज्यात ८० हजार गरिबांसाठी घरे बांधणार आहे. त्यासाठी ४ हजार कोटीची गुंतवणूक करण्यास मंजुरी देण्यात आलेय. राज्यातील शहरी भागात ही घरे बांधण्यात येणार आहेत.
देशद्रोह्यांचं समर्थन करत असतील तर राहुल गांधींना गोळ्या घाला, अशी मुक्ताफळे राजस्थानच्या भाजप आमदाराने उधळली आहेत.
आम्हाला कोणीही देशभक्ती शिकवू नये. देशप्रेम माझ्या रक्तात, माझ्या हृदयात आहे. माझ्या कुटुंबाने देशासाठी बलिदान दिलेय, असे म्हणत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.
पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३२ पैसे कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
इंजिनिअर दीप्ती सारना अचनाक बेपत्ता झाली होती. मात्र, तिनेच आपल्या कुटुंबीयांना फोन करुन सांगितले, मी सुखरुप आहे.
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी शंभर वर्षांपूर्वी ज्या गुरुत्वाकर्षण लहरींचं भाकीत केलं होतं. त्यांचा शोध लागलाय.
अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन या जोडीगोळीनं अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी स्लिपर आणि जनरल रेल्वे प्रवाशांसाठी ई-बेडरोल सुविधा सुरु केलेय. सुरुवातीला हा पायलट प्रोजेक्ट असेल. तो राजधानीमधील नवी दिल्ली आणि हजरत निजामुद्दिन या दोन स्टेशनमध्ये उपलब्ध करण्यात आलाय.