बंगळुरु येथील अपघातात १३ भाविक ठार

 मदानायाकनहल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. स्टील घेऊन जाणारा ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्याने हा अपघात आज पहाटे झाला.

PTI | Updated: Feb 19, 2016, 03:48 PM IST
बंगळुरु येथील अपघातात १३ भाविक ठार title=
संग्रहित फोटो

चित्रदूर्ग : मदानायाकनहल्ली येथे झालेल्या ट्रक अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. स्टील घेऊन जाणारा ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्याने हा अपघात आज पहाटे झाला.

तुरुवनूर रस्त्यावर लोखंड घेऊन निघालेला ट्रक भाविकांच्या वाहनावर पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची  माहिती पोलिसांनी दिली. ट्रकखाली दबून १२ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुले आणि काही महिलांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

 

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक भाविकांच्या वाहनावर जाऊन आदळला आणि त्यानंतर पलटी झाला. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.