दहीहंडीची उंची 20 फूटाचीच, 18 वर्षांखालील मुलांना बंदी : सर्वोच्च न्यायालय

यंदा दहीहंडीची उंची 20 फूटाचीच ठेवा. त्याचबरोबर 18 वर्षांखालील मुलांना सहभागी करुन घेऊ नका, असा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.

PTI | Updated: Aug 17, 2016, 01:25 PM IST
दहीहंडीची उंची 20 फूटाचीच, 18 वर्षांखालील मुलांना बंदी : सर्वोच्च न्यायालय title=

मुंबई : यंदा दहीहंडीची उंची 20 फूटाचीच ठेवा. त्याचबरोबर 18 वर्षांखालील मुलांना सहभागी करुन घेऊ नका, असा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला.

सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निकाल आज दिला. दहीहंडीची उंची 20 फूटांपेक्षा जास्त असणे आणि अठरा वर्षांच्या खालच्या गोविंदांना हंडीच्या पथकात सामील होण्याच्या निर्णयाविषयी राज्य सरकारने स्पष्टीकरण देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती.

गेल्या वर्षी दहीहंडी दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेत. दरम्यान, ही अंतिम सुनावणी नाही, यापुढेही सुनावणी होईल. हा अंतिम निर्णय नसल्याचे मत सरकारी वकीलांनी म्हटले आहे.