10
10
भारतीय लष्करानं पाकिस्तानच्या सात रेंजर्सना ठार केल्यानंतरही पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यात जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.
गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशियात महत्वाच्या 16 करारांवर सह्या झाल्यात. यामध्ये संरक्षणावर जास्त भर दिला गेलाय. त्यामुळे अत्याधुनिक संरक्षण प्रणाली भारताला मिळणार आहे. त्यानुसार S-400 ट्रीम्फ (Triumf) एअर डिफेन्स सिस्टम खरेदींचा. या करारातंर्गत भारताला रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळणार आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाकिस्तानातील लाहोरमधून हल्ल्याचा कट रचला तर तो तेथेच नष्ट करता येऊ शकेल.
गोव्यात सुरु असलेल्या ब्रिक्स परिषदेत भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये तब्बल 16 करार झालेत. भारत-रशियामध्ये झालेल्या महत्वाच्या करारात संरक्षण, पायाभूत सुविधा, विज्ञान, रिसर्च, अंतराळ संशोधन आदींचा समावेश आहे.
वाराणसीच्या राजघाट पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमधील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
सणासुदीच्या तोंडावर रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल आज गृहकर्जदारांना दिलासा देतात का याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागले आहे.
लोढा समितीच्या निर्बंधांचा पालन करण्यास नकार दिल्यानं आता बीसीसीआयची सर्व बँक खाती गोठवण्याचे आदेश लोढा समितीनं दिले आहेत.
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने घूसून कारवाई केली. यासाठी सर्जिकल ऑपरेशन केले. त्यानंतर पाकिस्तानच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविण्याबरोबर जोरदार हिसका दिला. घाबरलेल्या पाकिस्ताने तात्काळ संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडत पिओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाईकला पुढीलवेळी उत्तर देऊ असे उद्धट उत्तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिले आहे.
उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आजचा वाघा बॉर्डरचा 'बिटिंग द रिट्रीट' सोहळा बंद केला आहे.
उरी हल्ल्यानंतर भारताने शांतपणे विचार करत आज पाकिस्तानात घूसून दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. या कारवाईनंतर भारतात आनंदाचे वातावरण आहे. तर पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राइक कारवाईवरुन फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.