Makar Sankranti 2025 : अवघ्या काही दिवसांवर या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीचा सण आला आहे. येत्या 14 जानेवारी 2025 देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात महिला सुगड पूजेसह हळदीकुंकू समारंभ करतात. सण म्हटलं की, महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. मकर संक्रांतीला देवाला तिळगुळाचं नैवेद्य दाखवला जातो. तर सण म्हटलं की महिलांना नटताथटता करण्याची संधी. मग साडी कोणती नेसायची, त्यावर दागिनी कुठले अन् गजराशिवाय महिलेचा श्रृगांर अपूर्ण मानला जातो.
मकर संक्रांती म्हणजे काळा रंगाच्या साडीला महत्त्व असतो. पण त्याशिवाय मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी, कुठल्या रंगाच्या गोष्टी वर्ज्य असतात ते महत्त्वाचं असतं. हिंदू धर्मानुसार मकर संक्रांती सणाबद्दल काही नियम सांगण्यात आलंय.
14 जानेवारी 2025 ला सूर्य सकाळी 8.55 वाजता मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर या दिवशी देवी पिवळ्या रंगाची साडी परिधान करुन वाघावर स्वार होऊ येणार आहे. तर तिचं उपवाहन घोडा आहे. शिवाय कपाळावर केशरी टिळा असणार आहे. त्यामुळे यंदा पिवळ्या रंगाच्या साडीसह पिवळ्या बांगळ्या पिवळ्या रंगाच्या वस्तू, त्यासोबत देवी केशरी टिळा, जाईचा फुलांचा गजरा आणि पिवळ्या रंगाची फुले यावर बंदी असणार आहे.
आता महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहेत. जर यंदा मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे. तर सोन्याचे दागिनी आणि हळदी कुंकूवाच्या समारंभात हळद वापरायची का? तर देवी पिवळ्या रंगाची साडी आणि बांगड्या घालून येणार आहे. त्यामुळे पिवळा रंगाचे काही वापरायचं नाही. पण तुम्ही सोन्याचे दागिनी घालू शकतात. कारण यंदा मोत्याचे दागिनी घालायचे नाही आहे. होय, देवी मोत्याचे दागिनी घालून येणार आहे. तर देवीने केशरी टिळा लावला आहे. त्यामुळे हळदीशी त्याचा काही संबंध नाही. त्यामुळे महिलांनो तुम्ही हळदी कुंकू समारंभ करु शकणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)