राष्ट्रवादीने दिले आव्हान, ईव्हीएम मशिन करणार हॅक!

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 26, 2017, 09:48 PM IST
राष्ट्रवादीने दिले आव्हान,  ईव्हीएम मशिन करणार हॅक! title=

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या मतदान मशिनवर ठपका ठेवला. ईव्हीएम मशिनचा भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचा आरोप केला. यात आम आदमी, बसपा, समाजवादी पार्टीतील नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करण्याचे आव्हान दिले. हे आव्हान राष्ट्रवादीने स्विकारले आहे.

आम आदमीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईव्हीएम मशिन आम्ही हॅक करुन दाखवतो असे सांगून खास विधानसभेचे अधिवेशन घेतले. यावेळी त्यांनी हे मशिन हॅक करता येते याचे प्रात्यक्षित दाखवले. मात्र, निवडणूक आयोगाचे आव्हान दिले.

दरम्यान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करुन दाखवण्याचे निवडणूक आयोगाने दिलेले आव्हान केवळ राष्ट्रवादी काँग्रेसने स्विकारले आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक होऊ शकते असा दावा करणारा आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने हे आव्हान स्विकारण्यास नकार दिला. त्यांनी नियम बदलण्याची मागणी केली होती. पण निवडणूक आयोगाने त्याची मागणी फेटाळून लावलेय.  
 
राष्ट्रवादीने आव्हानाला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे येत्या ३ जून रोजी त्यांना ईव्हीएम मशीन हॅक करुन दाखवावी लागेल. सीपीआय, बीजेडी, सीपीआय(एम) आणि आरएलडी हे पक्ष तिथे उपस्थित हॅकिंग शक्य आहे का ? त्याचे निरीक्षण करतील. मागच्या काही काळापासून प्रत्येक निवडणुकीत सातत्याने भाजपाचा विजय होत असल्याने काही पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर संशय व्यक्त केला होता.