चेन्नई : माजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्तिक यांच्या येथील घरावर सीबीआयने छापा टाकला. चिदंबरम यांच्या एकूण 14 ठिकाणी ही छापेमारी केली.
आजसकाळी सात वाजता सीबीआय विभागाचे अधिकारी पोहोचले. त्यांनी काही कागदपत्र जप्त केलेत. तर संगणक हार्डडिस्कही जप्त केलेय. 14 ठिकाणांपैकी दिल्ली, नोयडा, चेन्नई येथील घरांवर हा छापा मारला आहे.
दरम्यान, कार्तिक यांना याआधी ईडीने नोटीस पाठवली होती. आज पिता-पुत्रांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला.
#Correction: CBI raid at former union minister P Chidambaram's residence in Chennai pic.twitter.com/0uw56UwmrG
— ANI (@ANI_news) May 16, 2017