10
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हाईट हाऊस भेट चर्चेचा विषय असताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया आणि डोनाल्ड ट्रम्प या दोघांनी मोदींचं स्वागत केले. आता नेदरलँड राष्ट्राध्यक्षांनी ट्विट करत मोदींचे हिंदीतून स्वागत केले. दरम्यान, मोदी यांनी हिंदीतून संवाद साधन अनिवासी भारतीयांची मने जिंकली. त्यांनी मोदी मोदी अशी घोषणा दिल्यात.
अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा सुरु आहे.
३० जूनपासून सरकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याच्या अधिसूचनेला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेतर्फे करण्यात आली. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिलाय. मात्र, पुढच्या सुनावणीदरम्यान, ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आलेय.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोविंद यांना दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार करावा, असं आवाहन त्यांचे मित्र आणि माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पुन्हा एकदा केले आहे. मात्र, यात अपयश आलेय.
तुमच्याकडे खर्चासाठी पैसे नसतील तर आताच तुम्ही पैसे एटीएमधून काढून ठेवा, नाही तर पैशाची चणचण भासण्याची शक्यता आहे. कारण तीन दिवस बॅंका बंद राहणार आहेत.
टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने कर्णधार विराट कोहली याच्यावरची जबाबदारी वाढली आहे. विराटवर आता दबाव वाढला आहे. वेस्टइंडिज दौऱ्यात टीम इंडियाला चांगले प्रदर्शन करण्यावर भर द्यावा लागणार आहे.
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅटमन्स गौतम गंभीर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. गौतमला कन्या रत्नाचा लाभ झाला.
उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि पंजाबपाठोपाठ आता कर्नाटक सरकारनंही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केलीय.
भारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सुरुवात केलेय.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पर्यायाने काँग्रेसला मोठा धक्का बसलाय.