ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट

ऐश्वर्या शेओरानची जीवनकथा ही साहस, महत्त्वाकांक्षा आणि बदलाचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या ऐश्वर्याने जे स्वप्न पाहिले, ते साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे. 

Intern | Updated: Jan 9, 2025, 05:42 PM IST
ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट title=

राजस्थानमधील प्रसिद्ध कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय कुमार यांची मुलगी असलेल्या ऐश्वर्याने आपल्या कुटुंबाच्या कर्तव्याच्या भावनेतून ग्लॅमरस जगातून बाहेर पडून समाजासाठी काम करण्याचे ठरवले.  तिच्या शालेय जीवनातील यशाची कहाणीही विशेष आहे. दिल्लीच्या संस्कृती स्कूलमध्ये 12वी बोर्ड परीक्षेत तिने 97.5% गुण मिळवले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली. कॉलेजमध्ये असताना, ऐश्वर्याला मॉडेलिंगच्या क्षेत्रातही गोडी लागली आणि तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. 2014 मध्ये मिस क्लीन अँड क्लियर फ्रेश फेस, 2015 मध्ये मिस दिल्ली आणि 2016 मध्ये मिस इंडिया फायनलिस्ट म्हणून तिने आपली छाप सोडली. फॅशनच्या क्षेत्रात तिचं भविष्य खूपच उज्वल होतं, पण तिच्या मनात एक वेगळी दिशा होती.

2018 मध्ये, ऐश्वर्याने IIM इंदूरसाठी पात्रता मिळवली, पण तिने त्या ऑफरला नाकारले आणि आपल्या खऱ्या ध्येयाकडे वळली. समाजसेवेसाठी स्वतःला समर्पित करण्याचा निर्णय तिने घेतला. त्यानंतर, 10 महिने स्वतःच्या अभ्यासात गुंतलेल्या ऐश्वर्याने UPSC नागरी सेवा परीक्षेत 93वा क्रमांक मिळवून आपले स्थान सिद्ध केले. तिच्या या यशाने हे सिद्ध केले की, कठोर परिश्रम, समर्पण आणि शिस्तीच्या जोरावर कोणतीही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात.

हे ही वाचा: 11 चित्रपट फ्लॉप दिल्यानंतर बुडतं करिअर वाचवण्यास 'या' चित्रपटाला बिग बींनी दिला होकार अन् आज...

आज ऐश्वर्या शेओरान UPSC पास झाल्यानंतर IFS अधिकारी म्हणून काम करत आहे आणि तिचे यश लाखो तरुणांसाठी प्रेरणा स्त्रोत बनले आहे. तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तिच्या कुटुंबाच्या आधाराने, शिस्तीने आणि कष्टाने तिने हे यश मिळवले आहे. तिच्या प्रेरणादायक प्रवासामुळे आज ती फक्त एक मॉडेलिंग आयकॉन नाही, तर समाजाच्या सेवेसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व बनली आहे.