10

लालूप्रसाद यादव कुटुंबियांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना आयकर विभागाने जोरदार धक्का दिलाय.  

अनिल कुंबळेविना टीम इंडिया वेस्ट इंडिजला

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला  लाजिरवाण्या पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना झाली आहे. मात्र, यावेळी प्रशिक्षक अनिल कुंबळेविनाच टीम इंडिया वेस्ट इंडिजकडे रवाना झाली.

दार्जिलिंग पेटले : आंदोलकांचा ममता सरकारशी बोलण्यास नकार, मात्र मोदींशी तयारी

स्वतंत्र गोरखालँड मागणीसाठीचं आंदोलन दिवसागणिक चिघळतच आहे. गोरखालँड जनमुक्ती मोर्चा म्हणजेच जीजेएमनं पश्चिम बंगाल सरकारशी कोणतीही चर्चा करायला नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी केंद्र सराकरशी बोलणी करण्यासाठी अनुकूलता दाखवली आहे. 

जर्मनीचे चॅन्सलरपद भूषवलेले हेलमट कोल यांचे निधन

तब्बल १६ वर्षं जर्मनीचं चॅन्सलरपद भूषवलेले हेलमट कोल यांचे निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

कोकण रेल्वे अत्याधुनिकीकरणाचा आराखडा सादर

कोकण रेल्वेच्या अत्याधुनिकीकरणच्या मोहीमेचा आराखडा मांडण्यात आला आहे. त्यानुसार कोकण रेल्वेच्या १४७ किलोमीटरच्या ट्रॅकचं दुपदरी करणाचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. 

शेतकरी आंदोलन : बंदच्या काळात लूट-जाळपोळ, रस्ता-रेल्वे वाहतुकीवर परिणाम

शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याने शेतकरी अधिक आक्रमक झालेत. बंदच्या काळात लुटीच्या घटनांत वाढ झालेय. तसेच आंदोलनामुळे रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय.

फटाक्याच्या कारखान्याला आग, आगीत २३ जणांचा होरपळून मृत्यू

मध्यप्रदेशातल्या बालाघाट जिल्ह्यातल्या खेरी गावात फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २३ जण होरपळून मृत्यूमुखी पडलेत. बुधवारी दुपारी 3च्या सुमारास लागलेल्या या आगीत १० जण भाजले असून त्यापैकी 8 जणांना नागपूरमध्ये हलवण्यात आलं आहे.  तर उरलेल्या दोघांवर बालाघाट जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

मेट्रो तीन : शिवसेनेचा राज्य सरकार आणि भाजपला दे धक्का

मेट्रो तीनच्या कारशेडसाठी भूखंडाचं आरक्षण बदलाचा प्रस्ताव नामंजूर करत, मुंबई महानगरपालिकेतल्या सत्ताधारी शिवसेनेने राज्य सरकार आणि भाजपला धक्का दिला आहे. 

इराण संसदेत दहशतवादी हल्ला, तीन जण जखमी

इराणची राजधानी तेहरानमध्ये आज दहशतवाद्यांनी दोन हल्ले केलेत. इराणच्या संसदेत घुसून एका दहशतवाद्यानं बेछुट गोळीबार केला. तर दुसरी कडे इराणाचे संस्थापक रोहुल्ला खोमेनी यांच्या मजारीच्या ठिकाणी आत्मघातकी स्फोट घडवून आणला.

रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आज दुसरा द्वैमासिक आढावा

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. या आढाव्यात कर्जाचे व्याज दर कमी होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.