शेअर मार्केटमध्ये तेजी, सेंसेक्सचा नवा उच्चांक

 सेंसेक्सने आज बाजारमध्ये मोठी उडी घेतली. आतापर्यंत सर्वाधिक नवा उच्चांक केलाय. सेंसेक्सने 25,735 झेप घेतली. सेन्सेक्सची आत्तापर्यंत सर्वात मोठी उसळी दिसून आली आहे. सेन्सेक्स 25735 अंशांवर, तर निफ्टी 7 हजार 700च्या जवळ होता.

PTI | Updated: Jul 2, 2014, 04:17 PM IST
शेअर मार्केटमध्ये तेजी, सेंसेक्सचा नवा उच्चांक title=

मुंबई : सेंसेक्सने आज बाजारमध्ये मोठी उडी घेतली. आतापर्यंत सर्वाधिक नवा उच्चांक केलाय. सेंसेक्सने 25,735 झेप घेतली. सेन्सेक्सची आत्तापर्यंत सर्वात मोठी उसळी दिसून आली आहे. सेन्सेक्स 25735 अंशांवर, तर निफ्टी 7 हजार 700च्या जवळ होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर दिसून आला. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया मजबुत झाला आहे. यामुळे बाजारात तेजी दिसून आली आहे. बाजार ओपन झाला त्यावेळी सेंसेक्स 25,732.87 वर होता. हा नविन उच्चांक आहे. तर निफ्टी 7700वर पोहोचला. 16 मे महिन्यानंतर सेंसेक्स आणि निफ्टीमध्ये 8.50 टक्के वाढ झाल्याचे दिसून आलेय.
 
तसेच गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळत असल्याने मुंबई शेअर बाजारात सुरुवातीलाच तेजी दिसून आली. 216 अंकाने बाजारात तेजी आली. 25,732.87 अंकावर सेंसेक्सचा उच्चांक दिसून आला.

अर्थसंकल्प मांडण्याचे संकेत मिळत आहे. 17 जुलैला देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येत आहे. इराकमधील परिस्थिती ठिक होत असल्याने याचाही परिणाम मार्केटवर दिसून येत आहे.

सोने किंमत कमी होत असल्याने याचाही परिणाम हा बाजारावर होत आहे. तसेच  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नवीन सुधारणा करण्याचे संकेत दिल्याने बाजारामध्ये तेजी दिसून येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.