फ्रान्समध्ये बुरखा घालण्यावर बंधन कायम

युरोपीय मानवाधिकार न्यायालयाने फ्रान्समध्ये बुरखा घालण्याचं बंधन कायम ठेवलं आहे.

PTI | Updated: Jul 2, 2014, 06:13 PM IST
फ्रान्समध्ये बुरखा घालण्यावर बंधन कायम title=

पॅरीस : युरोपीय मानवाधिकार न्यायालयाने फ्रान्समध्ये बुरखा घालण्याचं बंधन कायम ठेवलं आहे.

फ्रान्समधील कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी असे कोणतेच कपडे घालू नये, की ज्यामुळे चेहरा झाकला जाईल. 

फ्रान्स असा पहिला युरोपीय देश आहे, ज्याने सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंधन घातले आहे. एका फ्रान्स रहिवासी महिलेने यासंबंधी खटला दाखल केला आहे. त्या महिलेचे मत होते की, सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्याचे बंधन हे आमच्या धार्मिक आणि अभिव्यक्ती स्वतंत्रतेवर घाला आहे. 

न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की, बंधने ही कोणत्याही धार्मिक आधारावर घेतली गेली नाहीत...हा निर्णय केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतला गेलाय.बुरखा घातल्याने चेहरा लपला जातो म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. युरोपिय मानवाधिकार न्यायालयाचा हा निर्णय अंतिम आहे आणि त्या विरोधात कोणतीही याचिका करता येणार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.