10

आसाममध्ये पूर, राज्यस्थानमध्ये पाऊस

 एकीकडे महाराष्ट्राला वरुणराजानं हुलकावणी दिलीय तर दुसरीकडे आसामला पावसानं चांगलंच झोडपलंय. गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. अनेक लोक पुरात अडलेत.

चित्रपट अभिनेत्याने घरात घेतली फाशी

 अनेक जाहिराती आणि काही तमिळ चित्रपटात काम केलेले अभिनेते बालमुरली मोहन यांनी आपल्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५४ वर्षीय अभिनेत्याने पुरसावालकम येथे आपल्या घऱी फाशी घेऊन कथित आत्महत्या केली आहे.

इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी मालिका खेळण्यासाठी आव्हान - धोनी

 भारतीय संघ आता इंग्लड दौऱ्यावर जात आहे. मात्र, नवख्या खेळाडूंपुढे मोठे आव्हान असणार आहे. टीम इंडियामध्ये कसोटी सामने खेळण्याचा फारसा अनुभव नसलेले खेळाडू नसताना इंग्लंडविरोधात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणे आव्हानात्मक आहे, असे मत कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे.

वजन कमी केल्याने येते चांगली झोप

 ज्यांना जास्त वजनाचा त्रास होत त्यांनी 5 टक्के आपले वजन कमी केले तर त्यांना चांगली झोप मिळू शकते. वजन कमी केल्यानंतर सहा महिन्यानंतर चांगली आणि दीर्घ झोप मिळू शकते, असे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानात विमानावर हल्ला, एक ठार दोन जखमी

पाकिस्तानमधील पेशावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानावर जोरदार गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विमानातून उतरत असताना बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार गेला.  

फेसबुकनं केलं 'स्नॅपशॉट' सारखं 'स्लिंग्जशॉट' अॅप लॉन्च

फेसबुकनं 'स्लिंग्जशॉट' नावाचं नवं अॅप लॉन्च केलंय. या अॅपद्वारे यूजर्स आपले फोटो आणि व्हिडिओ सहज शेअर करू शकतील. स्नॅपशॉट हे यापूर्वीचं फेसबुकनं अॅप लॉन्च केलंय. 

21 जून पुन्हा ठरणार होता `काळा दिवस`, पण...

21 जून हा राज्यासाठी पुन्हा एकदा काळा दिवस ठरतो की काय? अशी परिस्थिती काल म्हणजेच 21 जून 2014 रोजी निर्माण झाली होती... पण, हुश्श ही भयावह परिस्थिती टळली आणि मुंबईकरांनी सुटकेचा श्वास टाकला. 

महागाईचा झटका, रेल्वेभाड्यात 14 टक्क्यांनी वाढ

रेल्वे मंत्रालयानं प्रवासी भाड्यात सुमारे 14 टक्क्यांनी वाढ केलीये. माल भाडंही सुमारे साडे सहा टक्क्यांनी वाढलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काहीच दिवसांपूर्वी आता आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील असं म्हटलं होतं. मोदी सरकारसमोर महागाईचं खूप मोठं आव्हान उभं आहे.

९१ बॉल्स २९५ रन्स, ३४ षटकार आणि ११ चौकार

आयर्लंड क्रिकेटमध्ये रविवारी सर्व स्कोरर आणि क्रिकेटचे तज्ज्ञ क्रिकेट रेकॉर्ड बूक शोधण्यात व्यस्त होते. इशं क्रिकेट इतिहासातील अशी मॅच खेळली गेली ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल.

गुप्तधनासाठी बापानं दिला चिमुकलीचा बळी

कर्नाटकातील फिरोजाबाद किल्ल्यातील गुप्तधन मिळावं यासाठी एका पित्याने आपल्या १५ महिन्यांच्या चिमुकलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेची बळी ठरलेल्या चिमुकलीच्या वडिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.