सेक्स रॅकेट चालविणारी महिला अटकेत

 ग्वाल्हेरच्या बहोडापूर भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला रेल्वे स्टेशनवरून सीएसपीच्या स्कॉडने अटक केली. ही महिला शहरातून पळून जाण्याच्या बेतात होती. ती स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होती. या महिलेची चौकशी करण्यात आली तेव्हा तीने या सेक्स रॅकेटमध्ये सामिल असलेल्या इतर महिलांचीही नावे सांगितली.या महिलांच्या घरी ती ग्राहकांना पाठवत होती.  

PTI | Updated: Jul 2, 2014, 03:09 PM IST
सेक्स रॅकेट चालविणारी महिला अटकेत title=
फाइल फोटो

ग्वाल्हेर :  ग्वाल्हेरच्या बहोडापूर भागात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेला रेल्वे स्टेशनवरून सीएसपीच्या स्कॉडने अटक केली. ही महिला शहरातून पळून जाण्याच्या बेतात होती. ती स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होती. या महिलेची चौकशी करण्यात आली तेव्हा तीने या सेक्स रॅकेटमध्ये सामिल असलेल्या इतर महिलांचीही नावे सांगितली.या महिलांच्या घरी ती ग्राहकांना पाठवत होती.  

पोलिसांनी देहव्यापार करणाऱ्या महिलांनाही अटक केली आहे. काही दिवसापूर्वी शहराती हजिरा भागात सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला होता. घटनास्थळावरून काही जणांना अटक करण्यात आली होती. पण यात प्रमुख महिला एजंटने पळ काढला होता. मंगळवारी रात्री बातमी मिळाली होती, की या सेक्स रॅकेटची प्रमुख सुनिता शहरातून पळ काढण्याच्या विचारात आहे, असे सीएसपी राहुल लोढा यांनी सांगितले.

माहिती मिळताच पोलिस स्टेशनवर पोहचून बहोडापूर येथून तिला पकडण्यात आले. तिची चौकशी करण्यात आली तेव्हा तिने सांगितले की, किला गेट, हजीरा आणि लष्कर भागातून तिच्या महिला साथीदारांच्या घरी ग्राहकांना पाठवत होती. घरांचे पत्ते मिळाल्यावर पोलिसांनी पाळत ठेवून इतर महिलांनाही ताब्यात घेतले.

५०० रुपये तासावर खोलीः सुनिता ग्राहकांना जागा उपलब्ध करून देत होती. काही महिलांचे घरं सेट करून ठेवले होते. यासाठी महिलांना एका तासासाठी ५०० रुपये देत होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.