10
10
कार्यालयात रमत-गमत आणि उशिरा येणाऱ्या सरकारी बाबूंना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चांगलाच धडा शिकवला. मंत्रालयात उशिरा येणाऱ्या लेटलतीफ २०० सरकारी कर्मचाऱ्यांना दणका दिला. जावडेकरांनी या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची किरकोळ रजा कापून घेत त्यांना घरी परत पाठवलं.
पेट्रोलच्या किंमतीत वाढ होऊन एक दिवस होत नाही तोच विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. घरगुती स्वयंपाक गॅस दरवाढ करण्यात आली आहे. 16.50 रुपये दराने वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे महागाईचा आता भडका उडाला आहे.
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला उपरती झालेली आहे. त्यानं आपल्याला आता कोणाच्याही सल्ल्याची गरज नसल्याचं म्हटलंय. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. लंडनमध्ये बीसीसीआय टीव्हीशी बोलतांना कोहलीनं कोहलीनं सोमवारी स्वत:च्या खेळाचं आणि क्षमतेचं मूल्यमापन केलं.
पाच वेळेचा विश्व विजेता ब्राझीलने विश्व चषकात चिलीला पेनल्टी शूटआऊटमध्ये हरवून टॉप १६ मध्ये जागा मिळविली. या सामन्याने ट्विटरचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहे.
इराकमधली सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारत सरकारनं आपली लष्करी तयारी सुरू केलीय. आयएनएस म्हैसूर आणि आयएनएस तर्कष या दोन युद्धनौका पर्शियन गल्फमध्ये तैनात केल्या आहेत.
राहुल गांधी यांनी पराभवानंतर काँग्रेसचं लोकसभेत नेतृत्व करायला हवं होतं, राहुल गांधी यांची सत्ता गाजवण्याची प्रवृत्ती नाही, त्याऐवजी राहुल गांधी यांना अन्यायाविरोधात लढायला आवडतं, असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटलंय.
टीम इंडिया 'द वॉल' अशी ओळख असलेला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. द्रविड हा आता टीम इंडियाचा बॅटींग सल्लागार बनला आहे.
चेन्नईमध्ये आज संध्याकाळी 11 मजली इमारत कोसळली. या अपघातात एक ठार झाला असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. जेमिनी फ्लायओव्हर जवळच्या भागात हा अपघात घडला.
चीनची दुहेरी चाल पुन्हा एकदा समोर आलीय. एकीकडे चीन नव्या सरकारशी मैत्रीचा हात पुढे करतंय तर दुसरीकडे ड्रॅगननं अरुणाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरचा एक मोठा हिस्सा आपल्या नकाशामध्ये दाखवलाय.
लहानपणीच माझे ओझे झाले होते. माझा जन्म झाला त्यावेळी अज्ञात व्यक्तीने, 'बेटी तो बोझ होती है' असे माझ्या आईला सांगितले. तिला मारून टाका, असा धक्कादायक सल्ला दिला. मात्र, माझी हिम्मतवाली होती. तिने याकडे दुर्लक्ष करुन मला लहानाची मोठी केली, असा धक्कादायक गौप्यस्फोट केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी केलाय.