रेल्वे बजेट : मुंबईसह राज्याच्या वाट्याला काय?

 देशातील पहिली 'बुलेट ट्रेन' मुंबई - अहमदाबाद अशी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे आणि स्टेशनवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर राज्यात काही हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.

PTI | Updated: Jul 8, 2014, 02:39 PM IST
रेल्वे बजेट : मुंबईसह राज्याच्या वाट्याला काय? title=

नवी दिल्ली :  देशातील पहिली 'बुलेट ट्रेन' मुंबई - अहमदाबाद अशी सुरू करण्याचा मनोदय व्यक्त रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. तसेच मुंबई लोकलला स्वयंचलित दरवाजे आणि स्टेशनवर सरकते जिने बसविण्यात येणार आहेत. तर राज्यात काही हायस्पीड ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत.

मुंबईत येत्या दोन वर्षांत ८६४ नव्या लोकल गाड्या सुरू करणार येणार सल्याची घोषणाही रेल्वेमंत्र्यांनी यावेळी केली. तर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर स्वयंचलित जिने बसविण्याचे रेल्वेसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या गाड्या

  • मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन
  • लोकमान्य टिळक टर्मिनस - आझमगड साप्ताहिक
  • मुंबई - काझीपेट एक्सप्रेस साप्ताहिक
  • मुंबई - पलितना एक्सप्रेस साप्ताहिक
  • बांद्रा - जयपूर एक्सप्रेस साप्ताहिक
  • बिदर - मुंबई एक्सप्रेस साप्ताहिक
  • लोकमान्य टिळक टर्मिनस - लखनऊ साप्ताहिक
  • नागपूर - अमृतसर साप्ताहिक
  • मुंबई सेंट्रल - नवी दिल्ली प्रिमीयम एसी एक्सप्रेस
  • गोवा- मुंबई हायस्पीड ट्रेन
  • जयनगर - मुंबई जनसाधारण एक्सप्रेस
  • मुंबई - गोरखपूर जनसाधारण एक्सप्रेस
  • नागपूर - सिकंदराबाद हायस्पीड ट्रेन
  • नागपूर - बिलासपूर हायस्पीड ट्रेन
  • गदग - पंढरपूर रेल्वे
  • नागपूर - पुणे साप्ताहिक
  • निझामुद्दीन -पुणे साप्ताहिक
  • दिल्ली - पुणे प्रिमीयम एक्सप्रेस
  • दिल्ली - अमृतसर हायस्पीट ट्रेन
  • दिल्ली - आग्रा हायस्पीड
  • दिल्ली - कानपूर हायस्पीड 
  • दिल्ली - चंडीगड  हायस्पीड
  • दिल्ली - पठानकोट हायस्पीड
  • चेन्नई - हैदराबाद हायस्पीड 
  • एकूण ९ मार्गांवर हायस्पीड ट्रेन

नवे रेल्वे मार्ग सुरू करणार

  • कर्जत - लोणावळा चौथी लाईन
  • औरंगाबाद - चाळीसगाव
  • सोलापूर - तुळजापूर
  • कसारा - इगतपुरी चौथी रेल्वे लाईन
  • गदग - पंढरपूर 
  • इटारसी - भुसावळ तिसरी लाईन
  • भुसावळ - बडनेरा-वर्धा तिसरी लाईन
  • नागपूर - विलासपूर मार्गावर जलद गाड्यांचे जाळे

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.