नाटिंघम: परिस्थिती ओळखून त्यानुसार योग्य तो निर्णय घेणं म्हणजे महेंद्र सिंह धोनीची खासियत आहे. मात्र मागील सात वर्षात भारताला आपल्या कॅप्टनसीनं सर्वोच्च स्थानावर नेणारा खेळाडू म्हणतो त्याच्या अंतरात्माचा आवाज तर्क-वितर्कांवर आधारित आहे. धोनीनं आपल्या 33व्या वाढदिवसानिमित्त 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्डकप पूर्वी सीनिअर खेळाडू असतांनाही महत्त्वाची जबाबदारी आणि आपल्या कप्तानी शैलीबाबत चर्चा केली.
भारताला टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1, 2011मध्ये वर्ल्डकप, 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्डकप चॅम्पियन आणि मागील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता बनवण्याबद्दल विचारलं असता धोनीनं सांगितलं की, तो मैदानात फक्त आपल्या मनाचा आवाज ऐकतो आणि निर्णय घेतो आणि यासाठी तो आपल्या अनुभवाचाही वापर करतो.
धोनीनं सांगितलं, “मी अनेक योजना बनवत नाही, आपल्या मनाच्या आवाजावर विश्वास ठेवतो. मात्र अनेकांच्या हे लक्षात येत नाही की मनाचा आवाज ऐकण्यापूर्वी आपल्यासाठी तेव्हाच्या परिस्थितीची माहिती असणं आवश्यक आहे.” धोनी पुढं म्हणाला, “उदाहरणसाठी आपल्याला जर बाईक बाबत काही माहिती नाही. जर मी माझ्या बाईकचं इंजिन उघडलं आणि ते तुमच्या समोर ठेवून म्हटलं सांगा ते कोणत्या बाईकचं आहे, तुमचं मन काय सांगतं. पण असं होणार नाही, आपल्या मनाचा आवाज येणार नाही, कारण तुम्हांला त्या इंजिनाविषयी आणि बाईक्स विषयी काही माहितीच नाहीय.”
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.