ब्राझिलच्या पराभवामुळं अल्पवयीन मुलीची आत्महत्या

फुटबॉल वर्ल्डकप मॅच आपल्या अखेरच्या टप्प्यात आलेला आहे. यजमान ब्राझील टीमचा सेमिफायनलमधील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागलाय. नेपाळमधील एका अल्पवयीन मुलीनं ब्राझिलच्या पराभवाचा धसका घेत चक्क आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

PTI | Updated: Jul 10, 2014, 03:56 PM IST
ब्राझिलच्या पराभवामुळं अल्पवयीन मुलीची आत्महत्या  title=

काठमांडू : फुटबॉल वर्ल्डकप मॅच आपल्या अखेरच्या टप्प्यात आलेला आहे. यजमान ब्राझील टीमचा सेमिफायनलमधील पराभव अनेकांच्या जिव्हारी लागलाय. नेपाळमधील एका अल्पवयीन मुलीनं ब्राझिलच्या पराभवाचा धसका घेत चक्क आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. 

नेपाळमधील एक मुलगी ब्राझिलच्या संघाची जबरदस्त चाहती होती. या १५ वर्षीय मुलीला ब्राझिलचा जर्मनीकडून झालेला पराभव सहन झाला नाही आणि तिनं गळफास लावून आत्महत्या केली. ब्राझिलच्या पराभवानंतर ती निराश झाली होती, असं पोलिसांनी सांगितलं. 

घरातील इतर लोक कामात व्यस्त असताना तिनं हे कृत्य केलं. वर्ल्डकप फुटबॉलचा ज्वर जगभरात तर आहेच पण काठमांडूमध्येही अनेक मुले वेगवेगळ्या देशांना पाठिंबा देत आहेत.  मात्र अशाप्रकारे आत्महत्या करणं हे चुकीचं आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.