पाकिस्तान सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ भारतीय जवान शहीद

जम्मू - काश्मीर इथल्या सीमा रेषेवर पाकिस्तान सैन्यानं शस्त्रसंधींचं उल्लंघन करत बुधवारी दुपारी भारतीय सैन्याच्या चौकींवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. 

PTI | Updated: Jul 16, 2014, 05:59 PM IST
पाकिस्तान सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, १ भारतीय जवान शहीद title=

श्रीनगर: जम्मू - काश्मीर इथल्या सीमा रेषेवर पाकिस्तान सैन्यानं शस्त्रसंधींचं उल्लंघन करत बुधवारी दुपारी भारतीय सैन्याच्या चौकींवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. 

जम्मू इथल्या आर. एस पूरा सेक्टरमधील पीतल पोस्ट इथं दुपारी १२ ते १२.२० दरम्यान पाकिस्तान सैन्यानं अंधाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात पीतल पोस्ट इथं तैनात असलेले सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) तीन जवान गंभीर झाले. यातील एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर दोन जवान गंभीर जखमी झाले. जखमींवर जम्मूतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.  

दरम्यान, वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तान विरोधात मोदी सरकार आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.