श्रीनगर: पाकिस्तानच्या कारवाया अद्याप सुरूच असून शुक्रवारी रात्री पाकिस्ताननं पुन्हा पूँछ जिल्ह्यात गोळीबार केला. पूँछ जिल्ह्यातील हमीरपूर सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर पाकिस्तानच्या जवानांनी गोळीबार केला.
सुदैवानं यात कोणीही जखमी झाले नसून भारतीय जवानांनीही या गोळीबारास चोख प्रत्युत्तर दिलं.
गेल्या तीन दिवासत पाकिस्ताननं तीनवेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला आहे.
पाकिस्तानच्या या कारवायामुळं सीमेवरील गावातील हजारो नागरिकांना गावातून स्थलांतर करावं लागलं असून ते बेघर झाले आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.