विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप आमने-सामने

लोकसभेत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर आज शिवसेना-भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत एक खासगी विधेयक मांडण्यात आले. मात्र, शिवसेनेने याला कडाडून विरोध केला.

PTI | Updated: Dec 12, 2014, 10:45 PM IST
विदर्भाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप आमने-सामने title=

नवी दिल्ली : लोकसभेत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावर आज शिवसेना-भाजप आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीबाबत एक खासगी विधेयक मांडण्यात आले. मात्र, शिवसेनेने याला कडाडून विरोध केला.

सत्ताधारी सरकारमधील भाजप सदस्य अशोक महादेव राव यांनी एक स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत विधेयक मांडले. हे खासगी विधेयक होते. 'विदर्भ राज्य निर्माण आयोग विधेयक २०१४' हे विधेयक मांडण्यासाठी राव उभे राहिले असता शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासहीत शिवसेना खासदारांनी तीव्र विरोध केला. दरम्यान, संसदेत खासगी विधेयकाला विरोध करण्याची परंपरा नाही.

या विधेयकात म्हटले आहे की, विदर्भाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी येथील लोकांना स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. विदर्भातील लोकांना वाटत आहे, आम्हाला सम्मान मिळाला पाहिजे. आमच्या सम्मानार्थ महाराष्ट्र राज्याचे दोन तुकडे करुन महाराष्ट्र आणि विदर्भ अशा राज्यांची निर्मिती करण्यात यावी.

१९८२मध्ये स्थापन करण्यात आलेल्या दांडेकर समितीच्या शिफारशी लक्षात घ्याव्यात, असे या खासगी विधेयकाच्या शिफारशीमध्ये म्हटले आहे. विदर्भावर अन्याय होत आहे. विदर्भ विभाग विकासाचा पैसा अन्यत्र वळला जातो. त्यामुळे विदर्भ अविकसित राहिला आहे. त्यामुळे विदर्भातील लोक महाराष्ट्राचा विरोधात आहेत. दरम्यान, भाजप वेगळ्या विदर्भ राज्याच्या बाजूने आहे. तर शिवसेना महाराष्ट्र विभागणी विरोध असून अखंड महाराष्ट्राच्या बाजूने आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.