हॉकीत पाकिस्तानकडून भारताचा पराभव, 'अश्लील जल्लोष'ची चौकशी

चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनल सामन्यात भारताविरूध्द पाकिस्ताननं विजय मिळविताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताविरूध्द अश्लिल हावभाव करीत जल्लोष केला. 

PTI | Updated: Dec 14, 2014, 08:49 AM IST
हॉकीत पाकिस्तानकडून भारताचा पराभव, 'अश्लील जल्लोष'ची चौकशी title=

भुवनेश्वर: चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनल सामन्यात भारताविरूध्द पाकिस्ताननं विजय मिळविताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारताविरूध्द अश्लील हावभाव करीत जल्लोष केला. 

जल्लोष करण्याच्या नादात अनेक खेळाडूंनी मैदानावरच आपले कपडे काढले. याविरोधात आक्षेप नोंदवित भारतानं पाकिस्तानविरूध्द तक्रार नोंदविली आहे. 

पाकिस्तानी संघानं भारतावर ४-३ असा पराभव करीत फायनलमध्ये धडक मारली. हा विजय साजरा करण्यासाठी पाकिस्तनी खेळाडूंनी शर्ट उतरविले तसंच प्रेक्षकांच्या दिशेनं भारताविरूध्द अश्लील हावभाव करीत जल्लोष केला. विजयाचा जल्लोष करावा पण त्याला अश्लील हावभाव नसावा असं सांगत पाकिस्तानी खेळाडूंच्या या जल्लोषाविरूध्द भारतानं नाराजी व्यक्त करीत तक्रार नोंदविली आहे, अशी माहिती भारतीय हॉकी संघाचे नरेंद्र बत्रा यांनी दिली. 

दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंच्या अश्लील जल्लोषाबद्दल पाकिस्तानी हॉकी संघाचे कोच शाहनाज शेख यांनी माफी मागितली असून त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.