चीनमध्ये १९ दिवसांत बांधली ५७ मजली इमारत

आपल्या फास्ट विकासासाठी चीन असाच ओळखला जात नाही. तशा घटनाही तिथं घडत असतात. चीनच्या हुनान प्रांतात एका कंपनीनं ५७ मजली मिनी स्काय स्क्रॅपर (इमारत) अवघ्या १९ दिवसांमध्ये पूर्ण केलीय. या इमारतीच्या बांधकामानंतर त्यांचं नाव जगातील सर्वात फास्ट काम करणाऱ्या बिल्डरच्या यादीत सामील झालंय. इमारतींच्या फास्ट बांधकामात चीन जगात सर्वात पुढे आहे. 

PTI | Updated: May 2, 2015, 06:08 PM IST
चीनमध्ये १९ दिवसांत बांधली ५७ मजली इमारत title=

हुनान: आपल्या फास्ट विकासासाठी चीन असाच ओळखला जात नाही. तशा घटनाही तिथं घडत असतात. चीनच्या हुनान प्रांतात एका कंपनीनं ५७ मजली मिनी स्काय स्क्रॅपर (इमारत) अवघ्या १९ दिवसांमध्ये पूर्ण केलीय. या इमारतीच्या बांधकामानंतर त्यांचं नाव जगातील सर्वात फास्ट काम करणाऱ्या बिल्डरच्या यादीत सामील झालंय. इमारतींच्या फास्ट बांधकामात चीन जगात सर्वात पुढे आहे. 

ही इमारत कंपनी २२० मजली जगातील सर्वात उंच इमारत केवळ तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा रेकॉर्ड बनवायचा आहे. चांगशामध्ये बनवलेल्या या बिल्डिंगमध्ये दररोज ३ मजले बांधले गेले. यासाठी १५ हजारांहून अधिक ट्रकांद्वारे सामान मागवलं गेलं. ही बिल्डिंग तयार करण्यासाठी मॉड्यूलर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. ही इमारत इकोफ्रेंडली सुद्धा आहे.

कंपनीच्या एका इंजिनिअर नुसार, ट्रेडिशनल पद्धतीनं स्कायस्क्रेपर तयार करण्यासाठी एक-एक वीट जोडावी लागते. मात्र आमच्या पद्धतीनुसार फक्त तयार ब्लॉक जोडावे लागतात. या पद्धतीच्या ब्लॉकचा वापर उंच इमारत बनविण्यासाठी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये केला जातो. पहिले या बिल्डिंगला २२० मजली बनविण्याची तयार केली होती. मात्र जवळच एअरपोर्ट असल्यानं याची उंची कमी केली गेली.

काही दिवसांपूर्वी चांगशामध्ये एक ३० मजली इमारत १५ दिवसांत बनवली होती. ही इकोफ्रेंडली आहे मात्र काही ऑनलाइन युजर्सनी इतक्या कमी वेळात इमारत बनविल्यानं तिच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. या बिल्डिंगच्या बांधकामाचा व्हिडिओ यू-ट्यूबवर खूप शेअर केला गेला. या इमारतीत ८०० अपार्टमेंट रेंटनं देण्यासाठी बनवल्यायेत आणि ४००० लोकांसाठी ऑफिस स्पेस पण आहे. याची विक्री मे महिन्यापासून सुरू होणार आहे. कंस्ट्रक्शन कंपनीचा दावा आहे की, इमारत अगदी सुरक्षित आहे आणि भूकंप प्रतिकार आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.