मतदानाद्वारे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश 'आर्यलँड'!

आर्यलँड आज जगातिल पहिला असा देश बनलाय जिथं मतदानाच्या आधारावर पहिल्यांदा समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आलीय. डबलिनमध्ये मोठ्या संख्येनं या विवाहाचे समर्थक एकत्रित आले. एकवेळी सर्वात शक्तिशाली कॅथलिक चर्च असलेल्या आर्यलँडसाठी हा धक्का आहे.

PTI | Updated: May 24, 2015, 10:37 AM IST
मतदानाद्वारे समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा पहिला देश 'आर्यलँड'! title=

डबलिन: आर्यलँड आज जगातिल पहिला असा देश बनलाय जिथं मतदानाच्या आधारावर पहिल्यांदा समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यात आलीय. डबलिनमध्ये मोठ्या संख्येनं या विवाहाचे समर्थक एकत्रित आले. एकवेळी सर्वात शक्तिशाली कॅथलिक चर्च असलेल्या आर्यलँडसाठी हा धक्का आहे.

४३ क्षेत्रांपैकी ४०मध्ये झालेल्या मतदानात तब्बल ६२.३ टक्के लोकांनी समलैंगिक विवाहाला होकार दिला. ही आकडेवारी स्थानिक सरकारी वृत्तवाहिनी आरटीईकडून मिळालीय. अजूनही मतमोजणी सुरू आहे. त्यामुळं निश्चित आकडेवारी नंतर कळेल.

डबलिन कॅस्टल मैदानात हजारो समलैंगिक विवाह समर्थक एकत्र आले होते आणि निकालानंतर आपला आनंद व्यक्त करत त्यांनी सप्तरंगी झेंडे फडकावले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.