जयललिता यांच्या शपथविधीत राष्ट्रगीताचा अवमान?

जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी जयललितांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. शपथविधीचा मुहूर्त साधण्यासाठी ५२ सेकंदांचं राष्ट्रगीत चक्क अवघ्या २० सेकंदांमध्येच आटोपलं. 

PTI | Updated: May 24, 2015, 12:10 PM IST
जयललिता यांच्या शपथविधीत राष्ट्रगीताचा अवमान? title=

चेन्नई: जयललिता यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी जयललितांनी राष्ट्रगीताचा अपमान केला. शपथविधीचा मुहूर्त साधण्यासाठी ५२ सेकंदांचं राष्ट्रगीत चक्क अवघ्या २० सेकंदांमध्येच आटोपलं. 

सूत्रांच्या माहितीनुसार, जयललिता यांना शपथविधीचा मुहूर्त साधायचा होता. मुहूर्त टळायला नको म्हणून जयललितांनी ‘जन-गण-मन’ अवघ्या २० सेकंदांत आटोपलं आणि शपथविधी सोहळा संपल्यानंतर संपूर्ण राष्ट्रगीत म्हटलं गेलं.

मद्रास विद्यापीठाच्या शतक महोत्सवी सभागृहात राज्यपाल के. रोसय्या यांनी जयललिता आणि त्यांच्या २८ मंत्र्यांना शपथ दिली. स्वत: जयललिता यांनी स्वतंत्रपणे शपथ घेतली. बाकीच्या मंत्र्यांना प्रत्येकी १४ जणांचे दोन गट करून सामूहिक शपथ दिली गेली. परिणामी २९ सदस्यीय मंत्रिमंडळाचा शपथविधी केवळ ३० मिनीटांत उरकला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.