murder

मानसी देशपांडेच्या गुन्हेगारास जन्मठेप

औरंगाबादच्या बहुचर्चित मानसी देशपांडे बलात्कार आणि खून खटल्यात आरोपी जावेद खानला जन्पठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शहरातील अहिंसानगरमध्ये राहणाऱ्या मानसीचा खून जावेद खान उर्फ टिंगऱ्या या चोरानं केला.

Mar 22, 2012, 06:09 PM IST

मेक्सिकोमध्ये १२ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या

मेक्सिकोच्या दक्षिणी राज्यात गुआरेरोमध्ये १० लोकांच्या हत्येसंदर्भात तपास करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर काही शस्त्रधारी लोकांनी हल्ला चढवून १२ पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केली.

Mar 20, 2012, 01:11 PM IST

अडीच वर्षांच्या मुलीची हत्या

सातारा जिल्ह्यातली बापाने मुलीला मारल्याची घटना ताजी असतानाच नात्याला काळं फासणारी अशीच आणखी एक क्रूर घटना समोर आली आहे.

Feb 27, 2012, 03:07 PM IST

मुलाचा खून करून वडिलांची आत्महत्या

पिंपरी - देहूरोड परिसरातील साईनगर येथे मुलाचा खून करून वडिलांनी आत्महत्या केली. ही बाब आज सकाळी उघडकीस आली आहे. मात्र, कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Feb 10, 2012, 12:11 PM IST

चोरांचा मैत्रीला 'शिरच्छेद'

चोरून आणलेल्या मालाच्या विभागणीवरून झालेल्या वादात एकाचं मुंडकं छाटण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. अर्जुन अलाप्पा पुजारी असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.

Jan 27, 2012, 08:57 PM IST

सतीश शेट्टी हत्त्येचा अजूनही उलगडा नाहीच

पुण्यात तळेगाव दाभाडेमधल्या सतीश शेट्टी यांच्या हत्येला आज दोन वर्षं पूर्ण होत आहेत. मात्र दुर्दैवानं या हत्या प्रकरणाचा अजून उलगडा झालेला नाही. सतीश शेट्टी यांची हत्या कोणी आणि कशासाठी केली, हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

Jan 13, 2012, 11:59 PM IST

चोर समजून निष्पापांची हत्या

चोर समजून ग्रामस्थांनी दोन इसमांना चोप दिला. ही दुर्घटना बोईसरच्या गुंदले गावात घडली असून ग्रामस्थांनी केलेल्या या हल्ल्यात दोन ड्रायव्हर जागीच ठार झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी १० ते १२ ग्रामस्थांना ताब्यात घेतलं आहे.

Jan 6, 2012, 11:14 PM IST

मित्रांनीच केला कॉलेज तरुणाचा खून

विरारच्या विठूरमाळी भागात राहणाऱ्या हितेश झा या कॉलेज तरूणाचा त्याच्या पाच मित्रांनीच जुन्या भांडणातून बळी घेतला. त्यातल्या चंदन या मित्रानं खुनाची कबुली दिल्यानं या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. यातले उरलेले चारही आरोपी फरार आहेत.

Jan 6, 2012, 07:46 PM IST

राजगुरुनगरमध्ये भर दिवसा हत्या

पुण्यातल्या राजगुरुनगरचे उपसरपंच सचिन भंडलकर यांची हत्या करण्यात आलीय. अज्ञात इसमांनी त्यांच्यावर तलवारीनं वार केले. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jan 1, 2012, 02:13 PM IST

अंबरनाथ वाळेकर हल्ला, शिवसेना नगरसेवकाला अटक

अंबरनाथचे शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर हल्लाप्रकरणाला शिवसेना नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे आणि त्याचा नातेवाईक योगेश ठाकरेला अटक करण्यात आली. या दोघांनाही ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

Dec 14, 2011, 08:16 AM IST

बारबालेचा केला प्रियकराने खून

मीरारोड येथील बारबालेच्या हत्येमुळे मीरारोड परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. मीरारोडमध्ये एका बारबालेची हत्या करण्यात आली आहे. मीरारोडमध्ये एका बारबालेची हत्या करण्यात आली आहे.

Dec 10, 2011, 12:22 PM IST

भाऊबीजेलाच भावाची हत्त्या

दोन भावांमधल्या भांडणात एका भावाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. टीव्हीचा आवाज कमी करण्याच्या शुल्लक कारणावरुन छोट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात हातोडा मारुन त्याचा खून केला.

Oct 29, 2011, 10:25 AM IST