www.24taas.com, सोलापूर
सातारा जिल्ह्यातली बापाने मुलीला मारल्याची घटना ताजी असतानाच नात्याला काळं फासणारी अशीच आणखी एक क्रूर घटना समोर आली आहे.
सोलापुरातल्या सांगोला तालुक्यातल्या वाढेगावात पित्यानं पोटच्या मुलीची हत्या केली आहे. अडीच वर्षाच्या मुलीला विहिरीत ढकलून हत्या करण्यात आलीये. वर्षा हजारे असं मुलीचं नाव आहे. आरोपी मारुती हजारे याला दोन बायका आहेत. या दोन बायकांचं भांडण झालं होतं. या भांडणाचा राग मनात धरुन मारुती हजारेनं अनितासह मुलीलाही शेतात नेलं. तिथं त्याने शेतातल्या विहिरीत चिमुरड्या वर्षाला फेकून दिलं.
सांगोला पोलिसांनी निर्दयी बापाला अटक केली आहे. तर त्याच्या दोन पत्नी आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[jwplayer mediaid="55992"]