murder

अखेर बंगल्यानं उलगडलं रहस्य...

अभिनेत्री लैला खानच्या हत्येचं गूढ आता उकललं आहे. काल तिच्या इगतपुरीच्या बंगल्याच्या परिसरात सहा सांगाडे सापडल्यानंतर आता तिच्या बंगल्यात चाकू आणि लोखंडी रॉड सापडलेत. याच हत्यारांनी लैला आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या या हत्यारांनी निर्घृणपणे करण्यात आल्याचं समोर येतंय.

Jul 11, 2012, 02:23 PM IST

स्त्री भ्रूण हत्या: दोषींवर 'दफा ३०२'

स्त्रीभ्रूण हत्येला जबाबदार असणाऱ्यांविरोधात आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार आहे. या संदर्भात राज्य सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहे. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टींनी विधानसभेत ही माहिती दिलीय.

Jul 10, 2012, 02:29 PM IST

पोटच्या मुलीनेच केली आईची हत्या

www.24taas.com, नाशिक

प्रेमाला विरोध केला म्हणून मुलीनंच आईची हत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडलीय.... अल्पवयीन मुलीनं प्रियकराच्या मदतीनं आईचा खून केला आणि मृतदेह कसारा घाटात फेकला.

 

Jul 5, 2012, 07:51 PM IST

अभिनेत्री लैला खानचा झाला खून?

गेल्या एक वर्षांपासून गूढरित्या गायब झालेल्या पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं लैलाच्या एक नातेवाईकासह दोघांना अटक केली आहे.

Jul 5, 2012, 11:15 AM IST

पत्नी, मुलीला ठार करून प्राध्यापकाची आत्महत्या

संजय उंबरकर या प्राध्यापकाने कौटुंबिक वादातून पत्नी , मुलीवर निर्घृण चाकूहल्ला केला. ही घटना ठाण्यातील ढोकाळी परिसरातील वर्धमान सोसायटीत घडली. या हल्ल्यात पत्नी आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला असून , मुलगा घरातून निसटल्याने तो वाचला. हल्ल्यानंतर पतीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून , त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Jul 3, 2012, 11:03 AM IST

करण कक्कड हत्या : शीर नसल्याचं स्पष्ट

सिनेनिर्माता करण कक्कडच्या हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक वळण मिळाले आहे. चिपळूण जवळच्या कुंभार्ली घाटातून गोळा केलेल्या मृतदेहाच्या अवशेषांमधील शीर करणचे नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

Jun 9, 2012, 04:46 PM IST

पुरूषांबरोबर नाच; चार महिलांना केले ठार

पाकिस्तानमध्ये विवाह सोहळ्यात पुरुषांबरोबर नृत्य करतानाचे मोबाईलवरील चित्रीकरण पाहून जिरगा आदिवासी जमातीच्या पंचायतीने महिलांना दोषी ठरवत त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले आणि त्याची कारवाईही झाली. एका लग्न सोहळ्यात पुरुषांसोबत गाणे आणि नृत्य करणे चार महिलांसाठी जिवावर बेतले आहे.

Jun 4, 2012, 08:48 PM IST

भाईंदरमध्ये अनैतिक संबंधातून हत्या

भाईंदर येथील साईबाबा नगरात सुरेश कुमार या व्यक्तीचा त्याच्या राहत्या घरात खून करण्यात आला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

May 31, 2012, 10:53 AM IST

बापानेच केला मुलीवर बलात्कार

पिंपरी-चिंचवडमधली गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही. आज पुन्हा दोन गुन्हेगारी घटनांनी पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे. ओटा स्कीम भागात एका नराधमानं स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केला. तर दुसरीकडे एका सुरक्षारक्षकानं कामगारावर गोळ्या झाडल्या. गेल्या नऊ दिवसातली ही नववी हत्या आहे.

May 30, 2012, 08:43 PM IST

'फेसबूक'वरील फोटोच्या भीतीने खून!

मुंबई पोलिसांनी एका विद्यार्थ्याच्या हत्येचा तब्बल 9 महिन्यांनी छडा लावलाय. विशेष म्हणजे एकमेकांचे जिवलग मित्र असलेले दोघे मित्र एकमेकांच्या जीवावर उठले. आणि मित्राच्या हत्येला कारण ठरलं ते एकमेकांची काढलेली छोटीशी खोडी आणि फेसबूक.

May 30, 2012, 07:19 PM IST

चोरटे समजून तिघांची केली हत्या

नागपुरात चोर समजून तिघांची ठेचून हत्या करण्यात आली आहे. नागपुरातल्या कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या भरतवाडा परिसरात ही घटना घडली. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच तीन जण भरतवाडा परिसरात संशयास्पद स्थितीत फिरत होते.

May 9, 2012, 01:20 PM IST

गडचिरोली : भाजीविक्रेतीवर बलात्कार- हत्या

गडचिरोली जिल्ह्यात एका भाजीविक्रेत्या महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हत्येनंतर महिलेचे नराधमांनी डोळे फोडले आणि महिलेचे शव जंगलातच टाकून पळ काढला.

May 8, 2012, 09:41 PM IST

पुणे विद्यापीठात रखवालदाराचा खून

पुणे विद्यापीठात रखवालदाराचा खून झाल्याची घटना घडलीय. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

May 4, 2012, 12:22 PM IST

कोल्हापुरात व्यापाऱ्याला गोळ्या घातल्या

कोल्हापुरात लाकू़ड व्यापारी अशोक बांदिवडेकर यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या खून छोटा राजनकडून करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Apr 20, 2012, 03:14 PM IST

मुलगा विकत न दिल्यामुळे मुलाचाच खून

औरंगाबादमधील वैजापूर शहरात मुलगा विकत न दिल्यामुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सहा वर्षीय रोहित भारस्करला विकत न दिल्यामुळे दोघांनी त्याचा धारदार शस्त्रानं पोटावर वार करून खून केल्याची घटना घडली.

Apr 10, 2012, 11:40 AM IST