झी २४ तास वेब टीम, ठाणे
दोन भावांमधल्या भांडणात एका भावाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. टीव्हीचा आवाज कमी करण्याच्या शुल्लक कारणावरुन छोट्या भावाने मोठ्या भावाच्या डोक्यात हातोडा मारुन त्याचा खून केला. भाऊबिजेच्या दिवशीच हा प्रकार घडला. कल्याण पश्चिमेतल्या रेल्वे कॉलनीत अहिरराव कुटुंबात हा प्रकार घडलाय. छोटा भाऊ नरेंद्र याने त्याच्या मोठ्या भावाची जितेंद्रची हत्या केली. जितेंद्रला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नरेंद्रला याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.