संध्या सिंह हत्याप्रकरणी मुलगा रघुवीर सिंहला अटक
नवी मुंबईतल्या संध्या सिंह हत्याप्रकरणी पहिली अटक झालीय. संध्याचा मुलगा रघुवीर सिंग पोलिसांना शरण येताच त्याला अटक करण्यात आलीय.
Dec 16, 2013, 10:05 PM ISTधक्कादायक: ओव्हर टेक करु दिलं नाही म्हणून डॉक्टरची हत्या
आजपर्यंत अनेक लहान मोठ्या कारणांवरुन हत्या झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या पाहिल्या असतील पण ओव्हर टेक सारख्या शुल्लक कारणावरुन एखाद्याची हत्या कुणी करेल का? होय ओव्हर टेक करु दिला नाही म्हणून कल्याणमध्ये एका डॉक्टराची हत्या करण्यात आलीय.
Dec 15, 2013, 09:46 PM ISTदलित तरुणीसोबत प्रेमविवाहापूर्वीच तरुणाची क्रूर हत्या
प्रेमविवाह करण्याआधीच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शहापूर-चेरपाली इथं घडलीय. तो एका दलित मुलीशी प्रेमविवाह करू इच्छित होता.
Dec 14, 2013, 04:28 PM ISTइंदर भाटिया हत्या प्रकरण : पप्पू कलानीला जन्मठेप
इंदर भटिजा हत्याप्रकरणात उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. कल्याण सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय.
Dec 3, 2013, 02:06 PM ISTवसईत बिल्डरची रिव्हॉल्वर - तलवारीनं हत्या
वसईच्या नायगाव जवळील वडवली गावाजवळ बांधकाम व्यावसायिक शैलेश ठाकूर यांची अज्ञात इसमांनी हत्या केलीय. ठाकूर हे माजी सरपंच आणि बहुजन विकास आघाडीचे नेतेही होते.
Dec 2, 2013, 09:55 AM ISTडॉ. दाभोळकरांच्या हत्येचा सुगावा - गृहमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी थोड्या प्रमाणात का होईना पण सुगावा लागलाय, असा दावा केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय.
Dec 2, 2013, 08:22 AM ISTपत्नी, मुलीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न
हे वाचून तुम्हाला जरा धक्काच बसेल, पण खरंय... स्वप्नात हनुमान आल्यानंतर एका व्यक्तीनं आपल्या पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर त्यानं आपल्या मुलीला मारल्यानंतर तिचं रक्तही पिलं. मनोज कुमार असं त्याचं नाव असून तो २५ वर्षांचा आहे.
Dec 1, 2013, 10:19 PM IST‘डॉ. दाभोलरांच्या हत्येमागे धर्मांध शक्ती नाही’
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमागे कोणत्याही धर्मांध शक्तींचा हात नाही, असं स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी हायकोर्टात दिलंय.
Nov 29, 2013, 03:45 PM ISTमाता न वैरीणी तू! चार दिवसांच्या चिमुकलीचा घेतला जीव
पुन्हा मुलगीच जन्माला आली म्हणून जन्मदात्या आईनेच आपल्या अवघ्या चार दिवसांच्या चिमुकलीला विष देऊन मारून टाकलंय. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातली ही आणखी एक उघडकीस आलेली घटना...
Nov 27, 2013, 11:28 PM ISTप्रेमाला नकार दिला म्हणून मैत्रिणीला जाळलं!
आपलं प्रेम नाकारल्याचा राग येऊन एका तरुणाने आपल्या मैत्रिणीची हत्या केली. इतकंच नव्हे, तर तरुणीची ओळख पटू नये, म्हणून तिचं प्रेत जाळलं
Nov 14, 2013, 10:52 PM ISTदरोडा आणि हत्येप्रकरणी ६ जणांना अटक
पाथर्डी गावातील मोंढे वस्तीवर १ नोव्हेंबर रोजी पडलेल्या दरोड्या प्रकरणी ६ जणांना १६ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
Nov 11, 2013, 10:01 AM ISTजिया खानची आत्महत्या नाही तर तिचा खून!
जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाबाबत नवीन माहिती पुढे आली आहे. तिने आत्महत्या केलेली नाही तर तिचा खून झाला असावा, असे सांगितले जात आहे. तसा नवीन फॉरेंसिक रिपोर्ट आला आहे. त्यात म्हटले आहे की जियाने आत्महत्या केलेली नाही. तिला कोणीतरी लटकविले असेल.
Nov 9, 2013, 05:47 PM ISTवंशाच्या दिव्यासाठी... आईच्या मदतीनं पत्नी-मुलींची हत्या!
अहमदनगर जिल्ह्यातल्या डोंगरगण इथली ही धक्कादायक घटना... नात्यांवरचा विश्वासच फोल ठरवणारी... आपल्या आईच्या मदतीनं पत्नी व दोन चिमुरडींची हत्या करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केलीय.
Nov 9, 2013, 11:17 AM ISTमामानंच केला भाचीचा बलात्कार आणि खून
नात्याला काळिमा फासणारी घटना सांगलीमध्ये घडलीय. चुलत मामानंच भाचीचं अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केलाच पण, त्यानंतर तिची हत्या करून तिला शेतात पुरून टाकल्याची घटना उघडकीस आलीय.
Nov 8, 2013, 11:07 AM IST