www.24taas.com, पुणे
पिंपरी - देहूरोड परिसरातील साईनगर येथे मुलाचा खून करून वडिलांनी आत्महत्या केली. ही बाब आज सकाळी उघडकीस आली आहे. मात्र, कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
देहूरोड परिसरात साईनगर भागात राहत असलेल्या रॉयल फर्नांडिस (२८) यांने पोटच्या चार वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला. रॉयस असे चिमुकल्याने नाव आहे. मुलाचा गळा घोटळ्यानंतर रॉयल फर्नांडिस यांने स्वतःच्या शरीरावर कटरने वार केले. त्यांना जखमी अवस्थेत वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस तपास करीत आहेत. मात्र, आत्महत्येमागील ठोस कारण समजू शकलेले नाही.
[jwplayer mediaid="45187"]