मीरा-भाईंदर पालिकेसाठी मतदानाला सुरुवात
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमधील ९५ वॉर्डसाठी आज निवडणूक होत आहे. त्यासाठी
आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये एक वॉर्डमधून बिनविरोध निवड झाल्याने, आज ९४ वॉर्डसाठीच मतदान होणार आहे. निवडणुक, सुरक्षा यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर
मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.
Jan 11, 2017, 04:34 PM ISTमहाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत होणार आहे. महाबळेश्वर, महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातली महाबळेश्वर ही नगरपालिका सर्वात जुनी गिरिस्थान नगरपालिका असून इंग्रज काळापासून तिला महत्त्व आहे.
Nov 8, 2016, 08:12 PM ISTजिंतूरमध्ये जोरदार चूरस, राष्ट्रवादीत बंडखोरीने तिरंगी लढत
नगरपालिका निवडणुकांचे पडघम जोरात वाजले असून परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्यात. परभणी जिल्ह्यातली महत्वाची नगरपालिका म्हणून जिंतूर नगरपालिकेकडे बघितले जाते. इथे आजी माजी आमदारांचा कट्टर संघर्ष बघायला मिळतो. मात्र यावेळेस राष्ट्रवादीतून बंडखोरीकरून दोघात तिसरा आल्याने तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.
Nov 8, 2016, 07:05 PM ISTराज्यात युती मात्र रत्नागिरीत शिवसेना-भाजप आमनेसामने
राज्यात शिवसेनेची युती झालीय खरी पण रत्नागिरी नगरपरिषदेसाठी शिवसेना-भाजप आमनेसामने आहेत. शिवसेनेकडून उदय सामंतांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादीनंही आपल्यालाच जनतेचा कौल मिळेल असा दावा केला असला तरी खरं चित्र 28 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.
Nov 8, 2016, 06:22 PM ISTदोंडाईचा शिरपूरची सत्तासुंदरी कोणाकडे...
राजकारणात घराणेशाही हा परवलीचा आणि कार्यकत्यांच्या अंगवळणी पडलेला शब्द झालाय. सत्ताधरी असो की विरोधक प्रमुख नेते... सत्तासुंदरी आपल्या घराबाहेर पडू नये असं नियोजन नेहमी करत असतात. घराणेशाहीचा अनोखा सोहळा धुळे जिल्ह्यातील मतदार अनुभवतायत. जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे प्रमुख उमेदवार घराणेशाहीतूनच मतदारांसमोर आले आहेत.
Nov 7, 2016, 10:07 PM ISTजुन्नरचा गड कोण राखणार?
जुन्नर पालिकेत कुणाची सत्ता येणार, जुन्नकर कुणाच्या ताब्यात नगर परिषदेचा कारभार सोपवणार...
Nov 7, 2016, 09:32 PM ISTकराडचा आखाडा कोण जिंकणार?
कराड नगरपालिकेत चौरंगी लढत होतेय... कराड नगरपालिका पश्चिम महाराष्ट्रातली राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी पालिका....याठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
Nov 7, 2016, 09:17 PM ISTजालना पालिकेत मंत्री अर्जुन खोतकरांची प्रतिष्ठा पणाला..
जालना पालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं तसंच भाजप-शिवसेना युतीनंही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलीय. यानिमित्तानं शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
Nov 7, 2016, 09:04 PM ISTमालवण नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार ?
मालवण शहरात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला साकडं घालून शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं प्रचाराचा शुभारंभ केलाय...
Nov 7, 2016, 08:52 PM ISTरत्नागिरीत भाजप राष्ट्रवादीला मोठा धक्का देणार?
रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष शिगेला पोहोचलाय. नाराज असलेल्या भास्कर जाधवांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिलीय तर रमेश कदम यांनी जाधवांवर तोफ डागलीय. दुसरीकडे दोघांच्या भांडणात राजकीय लोणी खाण्यासाठी भाजपा टपून बसल्याचीही चर्चा आहे.
Oct 27, 2016, 09:11 PM ISTअकोल्यात बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अपक्षांना भाव चढणार?
अकोला जिल्ह्यात पाच नगरपालिकांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढायला सुरुवात झालीय.
Oct 26, 2016, 09:25 PM ISTरत्नागिरीत शिवसेनेचे 15 उमेदवार तर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर
रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेने आपली 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, नगराध्यपदाचा उमेदावर जाहीर केलेला नाही. तर राष्ट्रवादीने उमेश शेट्ये यांना थेट नगराध्यपक्षासाठी उमेदवार जाहीर केलेय.
Oct 26, 2016, 08:56 AM ISTनिलंग्याचे नागरिक आजोबा-नातवातल्या युद्धाला कंटाळले?
जिल्ह्यातल्या चार नगरपालिकांपैकी निलंगा नगरपालिकेचा रणसंग्राम चांगलाच रंगणार अशी चिन्ह आहेत.
Oct 25, 2016, 07:54 PM ISTलातूरवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहणार?
जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांच्या निवडणुका येत्या 14 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलीय.
Oct 25, 2016, 07:42 PM IST