राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

Updated: Jan 11, 2017, 05:33 PM IST
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर title=

मुंबई : मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २५ जिल्हा परिषदा आणि २९६ पंचायत समितींची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. तर मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, निवडणुकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

१० महापालिकांसाठी...

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती आणि सोलापूर या १० महापालिकांसाठी निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात होतील. त्यासाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 

जिल्हा परिषद दोन टप्प्यांत 

तसेच नागपूर वगळता २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होतील. पहिल्या टप्प्यात १६ फेब्रुवारी आणि दुसऱ्या टप्प्यात १० जिल्हा परिषदांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.

मतमोजणी २३ फेब्रुवारी

जिल्हा परिषदांसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १६ फेब्रुवारी, तर दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी होईल. 

झी २४ तास LIVE अपडेट

16:17 PM
मुंबई : महापालिका निवडणूक - 21 जानेवारी ते 3 फेब्रुवारीपर्यंत 10 महानगरपालिकाचे उमेदवारी अर्ज दाखल दाखल करण्याची मुदत असेल - निवडणूक आयोग
16:15 PM
मुंबई : पहिल्या टप्प्याचे मतदान हे १६ फेब्रुवारीला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान २१ फेब्रुवारीला, २१  फेब्रुवारीला १० महापालिकांचे मतदान तर २३ फेब्रुवारीला होणार मतमोजणी  - निवडणूक आयुक्त
16:14 PM
मुंबई : नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीला न्यायालयाची स्थगिती असल्याने तेथील निवडणूक जाहीर करता येणार नाही -  निवडणूक आयुक्त
16:13 PM
मुंबई : 10 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जाणार आहेत - निवडणूक आयोग
16:12 PM
मुंबई : महापालिका निवडणूक : 10 मनपाची मुदत चार मार्च ते 3 एप्रिल रोजी संपणार आहे - निवडणूक आयोग
16:10 PM
मुंबई : पहिल्या टप्प्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली तर  दुसऱ्या टप्प्यात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणुका होणार 
16:09 PM
मुंबई : जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होणार
16:08 PM
मुंबई : ठाणे, पालघर, धुळे, वाशिम, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदीया हे जिल्हे वगळून राज्यात अन्य जिल्ह्यात निवडणुका  
16:07 PM
मुंबई : नागपूर सोडून राज्यातील अन्य  भागातील निवडणुका जाहीर करणार आहेत. 
16:04 PM
मुंबई : २६ जिल्हा परिषद, १० महापालिका आणि २९६ पंचायत समिती या स्थानिक स्वराज निवडणुका जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत परीक्षा यांचा विचार केला आहे. - निवडणूक आयुक्त

16:04 PM
मुंबई : राज्यात आजपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणूक जाहीर होणार