महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत होणार आहे. महाबळेश्वर, महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातली महाबळेश्वर ही नगरपालिका सर्वात जुनी गिरिस्थान नगरपालिका असून इंग्रज काळापासून तिला महत्त्व आहे. 

Updated: Nov 8, 2016, 08:12 PM IST
महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत title=

सातारा : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत होणार आहे. महाबळेश्वर, महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातली महाबळेश्वर ही नगरपालिका सर्वात जुनी गिरिस्थान नगरपालिका असून इंग्रज काळापासून तिला महत्त्व आहे. 

महाबळेश्वर नगरपालिकेसाठी 8 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या 17 एवढी आहे. नगराध्यक्षपद इतर मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित आहे. गेल्या 5 वर्षांतील पहिली अडीच वर्षे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या लोकमित्र जनसेवा आघाडीची सत्ता होती तर पुढची अडीच वर्ष एक अपक्ष राष्ट्रवादीत आल्याने राष्ट्रवादी प्रणित महाबळेश्वर विकास आघाडीकडे सत्ता आली. शिवसेना आणि राष्ट्रवादीत अटीतटीची लढत अपेक्षित आहे. 

गेल्या अडीच वर्षात महाबळेश्वरमधले रस्ते आणि ड्रेनेज आणि वाहतूक कोंडीची समस्या सत्ताधारी सोडवू शकले नसल्याचा आरोप शिवसेना आणि स्थानिक करत आहे. तर महाबळेश्वरमधल्या विविध पॉईन्ट्सचं सुशोभीकरण, पर्यटकांसाठई प्रशस्त पार्किंगची उभारणी, घनकचरा आणि अंतर्गत रस्त्याचं काम केल्याचा दावा राष्ट्रवादी प्रणित महाबळेश्वर विकास आघाडीनं केला आहे. 

महाबळेश्वर हे पर्यटनाचं प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे इथल्या लाखो पर्यटकांना आणि व्यापा-यांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे आणि त्यासाठी जो कुणी सक्षम असेल त्यांच्या पदरात महाबळेश्वरची जनता मत टाकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.