monsoon

उत्तराखंडमधून वाचविलेल्यांची यादी

उत्तरकाशी आणि केदारनाथ येथे गंगेच्या प्रकोपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले होते. या अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकातून काही जणांना वाचविण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे.

Jun 20, 2013, 09:31 PM IST

ही कारणेः का होते ढगफुटी, का येतो महापूर

ढगफुटी ही पावसाचे एक भयानक रूप आहे. या खतरनाक स्थितीत

Jun 20, 2013, 04:24 PM IST

फोटो : केदानाथ पहिल्यांदा आणि आत्ता!

उत्तराखंडमधल्या जलप्रकोपानं केदारनाथला होत्याचं नव्हतं करून टाकलंय. सध्या केदारनाथ मंदिराचा गाभारा सोडून आणखी काहीही उरलेलं दिसत नाही.

Jun 20, 2013, 10:43 AM IST

मुंबईत पावसाचा ५२ वर्षांचा रेकॉर्ड मोडीत

पहिल्याच पावसानं मुंबईला चक्काजाम करून दणका दिला असला, तरी हाच पाऊस एक गुड न्यूजही घेऊन आलाय. यंदा मुंबई महापालिकेच्या सर्व धरणांची पातळी वेळेपेक्षा आधीच चांगली झालीये. १८ जूनच्या आकडेवारीनुसार गेल्या ४ वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या लवकर मुंबईची सर्व धरणं सर्वाधिक भरलीयत.

Jun 19, 2013, 08:32 PM IST

१० हजार जण सुरक्षित स्थळी - पंतप्रधान

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी मदतकार्यात जोरात सुरू असल्याची माहिती पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलीय. आतापर्यंत १० हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय.

Jun 19, 2013, 07:07 PM IST

उत्तराखंडमध्ये ठाण्यातील महिलेचा मृत्यू

उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.

Jun 19, 2013, 05:29 PM IST

उत्तराखंड : राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू?

राज्यातील भाविकांना सुखरुप आणण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी पू्र्ण प्रयत्न करण्याचं सरकारचं आश्वासन दिलंय. दरम्यान, या जलप्रलयात राज्यातील नऊ महिलांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jun 19, 2013, 02:37 PM IST

केदारनाथ उद्ध्वस्त, पुरात हजारो बेपत्ता

गंगेच्या प्रकोपानं केदारनाथाचा संपूर्ण परिसर उध्वस्त केलाय. या प्रकोपापूर्वी केदारनाथचा परिसर घरं आणि दुकानांनी गजबजलेला होता. गंगेच्या प्रकोपानं मात्र हा सर्व परिसर जलमय झाला असून होत्याचं नव्हतं झालंय.

Jun 19, 2013, 01:55 PM IST

उत्तराखंड : लष्कराचं बचावकार्य सुरू

उत्तराखंडमध्ये आतापर्यंत ६२ ते ७० हजार भाविक अडकल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी वर्तवलीय. पाच हजार भाविकांना सुखरुप वाचवण्यात यश आल्याचं शिंदेंनी माहिती दिलीय.

Jun 19, 2013, 01:45 PM IST

यंदा पडला चौपट पाऊस!

राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. ठाणे जिल्ह्याला गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसान चांगलचं झोडपून काढलय. कल्याण-डोंबिवली, बदलापूर परिसरात संततधार सुरुय.

Jun 18, 2013, 05:42 PM IST

उत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर

उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.

Jun 18, 2013, 04:32 PM IST

पावसाचा जोर कमी, मुंबई पूर्वपदावर

मुंबईत सुपरसंडेला धो-धो बरसणा-या पावसाचा जोर आठवड्याच्या सुरुवातीला कमी झालाय. सकाळपासूनच मुंबईत पावसाचा जोर ओसरण्यास सुरुवात झालीय. जोरदार पाऊस नसल्यानं लोकल सेवा सुरळीत सुरु आहे तर ट्रॅफिकही पूर्वपदावर आलंय.

Jun 17, 2013, 09:31 AM IST

पुण्यात जोरदार पाऊस

पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरु असून तब्बल 300 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आलीय.

Jun 16, 2013, 07:23 PM IST

पावसाने उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईमध्ये पावसाचा दणका बसल्यामुळे सकाळपासूनच उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.

Jun 10, 2013, 10:18 AM IST

ठाणे, कल्याणमध्ये जोरदार पाऊस, लोकलवर परिणाम

राज्यात रविवारी बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. कोकणमध्ये दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह बोरीवली, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याणमध्ये पावसाचा जोर दिसून येत आहे. या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून येत आहे.

Jun 10, 2013, 07:53 AM IST