monsoon

मुंबईत विश्रांती, पुणे, नाशिक, विदर्भाकडे पावसाचा मोर्चा

राज्यातल्या जवळपास सर्व भागात आता पावसाला सुरूवात झालीय. मुंबईत गेले तीन दिवस कोसळणा-या पावसाने आज थोडी विश्रांती घेतली. पावसाने आता आपला मोर्चा नाशिक पुणे नागपूर या शहरांकडेही वळवलाय. काल पहाटेपासून पुण्यात कोसळत असलेल्या पावसाने जूनची सरासरी ओलांडलीय. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने 14 गावांची संपर्क तुटलाय. तर संपूर्ण विदर्भासह नागपूरमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावलीय. पावसाने शहरात एक बळी घेतलाय. 

Jun 22, 2015, 09:06 PM IST

पश्चिम महाराष्ट्रात 'मान्सून योग'

पावसाने पश्चिम महाराष्ट्रासाठी आज मान्सून योग आखला आहे. रविवारी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या आहेत.

Jun 21, 2015, 09:44 PM IST

पंचगंगेच्या पाणी पातळीत वेगाने वाढ

 कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे, पंचगंगा नदीची पातळी दर तासाला एका फुटाने वाढतेय, पंचगंगा नदीची पातळी बारा तासात पाच फुटाने वाढलीय. पंचगंगा नदीची पातळी शनिवारी सायंकाळी चार वाजता ८.६ फूट होती, आज सकाळी १३.६ फूट सहा इंचावर पोचली. पंचगंगेच्या पाण्याची पातळी १२ तासांत तब्बल ५ फुटांनी वाढलंय.

Jun 21, 2015, 06:59 PM IST

मुंबई- कोकणात मुसळधार पाऊस, कोकण रेल्वे रखडली

मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसर आणि कोकणाला पावसानं झोडपून काढलंय.  मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं आज पुन्हा सलग तिसऱ्या दिवशी तिन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिटं उशिरानं सुरु आहे. पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला होता. शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसानं आज पहाटेपासूनच मुंबई शहर आणि उपनगरात जोर धरलाय.

Jun 21, 2015, 01:52 PM IST