www.24taas.com, झी मीडिया, उत्तराखंड
उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.
ढग फुटल्यागत पाऊस झाल्याने उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पुराची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हरियाणमध्ये यमुनेच्या पाण्यात वाढ झाल्यानं इथं काही ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीनं चिंतेत वाढ झालीय. पुरामुळे अनेक जणांचे बळी गेलेत तर शेकडो जण पुराच्या पाण्यात अडकून पडलेत.
उत्तराखंडमध्ये पावसाने थैमान घातलयं. गेल्या ४८ तासांपासून न थांबलेल्या पावसानं थैमान घातलंय. राज्यातल्या सर्व नद्यांना महापूर आलाय. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालंय. याचा फटका उत्तरकाशीतल्या पर्यटकांनाही बसलाय. महाराष्ट्रातून काशीत गेलेले भाविकही या ठिकाणी अडकले आहेत.
नाशिकमधून ७० भाविक, औरंगाबादमधून १७ जण तर लातूरचे ६ जण उत्तर काशीला गेलेले आहेत. हे सर्व भाविक संकटात सापडले आहेत. महाराष्ट्र सरकारनं उत्तर प्रदेश शासनाशी संपर्क साधून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.