राष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोप

Supriya Sule : चार वेळा तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं...अजित पवारांच्या टीकेला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय..

वनिता कांबळे | Updated: Nov 17, 2024, 12:02 AM IST
राष्ट्रवादी शरद पवार पक्षला चकवा देण्यासाठी भाजपने पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात उतरवले; सुप्रिया सुळेंचा आरोप title=

Maharashtra Assembly Elections 2024 :  288 पैकी 163 जागेवर अपक्षांना पिपाणी चिन्हं दिलं. भाजप रडीचा डाव खेळतोय, अशी टीका सुप्रिया सुळेंनी भाजपवर केलाय. अजित पवारांनीही स्वतः साता-याच्या सभेत याबाबत कबुली दिली होती, असंही सुळे म्हणाल्या.

लोकसभा निवडणुकीला पिपाणीवाल्या उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या तुतारीवाल्यांची मोठ्या प्रमाणात मतं खाल्ली होती. विधानसभेलाही त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात 288 मतदारसंघांपैकी तब्बल 163 मतदारसंघात ट्रॅम्पेट म्हणजे पिपाणीवाले उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभेला टॅम्पेटवाल्या तुतारीच्या चकव्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची लाखो मतं वाया गेली होती. सातारा लोकसभा निवडणुकीत ट्रॅम्पेटमुळं शशिकांत शिंदेंचा पराभव झाला होता. तशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही दिली होती.

विधानसभेलाही राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चकवा देण्यासाठी पिपाणीवाले 163 उमेदवार रिंगणात भाजपनं उतरवल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. भाजप रडीचा डाव खेळत असल्याचा आरोपही सुप्रियांनी केलाय.

सुप्रिया सुळेंच्या या आरोपांवर भाजपनं पलटवार केलाय. टॅम्पेट हे निवडणूक चिन्हं भाजप वाटत नसून ते निवडणूक आयोग वाटून देतं याचा सुप्रिया सुळेंना विसर पडला का असा टोला भाजपनं लगावलाय. तुतारीवाला माणूस घराघरात गेल्याचं लोकसभेच्या निकालातून अधोरेखित झालंय. तरीही विधानसभेला पिपाणीचा फंडा मविआला मारक ठरतो का हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.