पुण्यात जोरदार पाऊस

पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरु असून तब्बल 300 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 16, 2013, 07:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात जोरदार पाऊस सुरु आहे. लोणावळ्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरु असून तब्बल 300 मि.मी.पावसाची नोंद करण्यात आलीय.
शनिवारपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील 50 टक्के रस्ते पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे तसंच राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील वाहतूकही या पावसामुळे थंडावलीय. मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने एक स्कॉरपीयो गाडी चालकाचा ताबा सुटून रस्त्यातच पलटी झाल्याची घटनाही येथे घडली आहे. खंडाळा घाटामध्ये मंकी हिल येथे रेल्वेलाईन वर एक दगड पडल्यामुळे रेल्वे सेवाही काही काळ विस्कळीत झाली होती. लोणावळयात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनीही या मुसळधार पावसामुळे हॉटेलच्या बाहेर पडण्यापेक्षा आतच बसणे पसंत केले.
लोणावळयातील पर्यटकांची पंढरी समजला जाणरा भुशी डॅमही ओव्हरल्फो झाला असून शहरातील तुंगार्ली धरण, लोणावळा धरण, वलवण धरण या धरणाच्या पाणीसाठयातही मोठी वाढ झाली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.