maratha reservation news

मराठ्यांची नाराजी शिंदे-फडणवीसांना परवडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा... संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार

Maratha Reservation : मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवालीत सराटीत आलेत. जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज संध्याकाळी जरांगे आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहेत. खबरदारीसाठी जालना, संभाजीनगरमधील इंटरनेट आणि एसटी सेवा बंद करण्यात आलीय. 

Feb 26, 2024, 02:15 PM IST

मराठा आरक्षणाची धग वाढली; मनोज जरांगेंची प्रकृती खालावताच राज्याच्या 'या' भागांत कडकडीत बंद

Maratha Reservation latest news : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अद्यापही काही मागण्यांची पूर्तता न झाल्या कारणानं मनोज जरांगे काही दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. 

 

Feb 16, 2024, 10:30 AM IST

डॉक्टरांना माघारी पाठवलं, मनोज जरांगेंचे पुन्हा उपचार घेण्यास नकार... मुंबई हायकोर्टाने घेतली दखल

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण पुकारलं असून उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे.

Feb 15, 2024, 05:57 PM IST

'आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून नाटकं करावीत अन्यथा..' नारायण राणे यांचं जरांगेंना आव्हान

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील  पाचव्या दिवशीही उपोषणावर ठाम आहेत. जीव गेल्यास महाराष्ट्राची लंका होईल असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. तसंच पीएम मोदी यांच्या महाराष्ट्रात सभा होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय.

Feb 14, 2024, 02:04 PM IST

16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार?

Maratha Reservation Latest News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असतानाच सरकार एक दिवसाचे अधिवेशन बोलवणार आहे. 

Feb 12, 2024, 11:03 AM IST

भुजबळ राष्ट्रपती झाले तरी आरक्षण ओबीसीतूनच घेणार, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या मुंबई, पुणे, नाशिक दौऱ्याला आजपासून सुरुवात झाली. जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारलंय.. सगेसोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. 

 

Feb 6, 2024, 01:54 PM IST

'माझ्याविरोधात काहींनी सुपारी घेतली' मनोज जरांगेंचं सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार

Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला.. मात्र जोपर्यंत अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा इशारा जरांगेंनी दिलाय. आणि यावरुनच आता नव्या आंदोलनाची हाक मनोज जरांगेंनी दिलीय.

Feb 5, 2024, 07:15 PM IST

मनोज जरांगे 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार, रायगडावरून मोठी घोषणा

Maratha Reservation :  मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील  किल्ले रायगडावर पोहोचले. रायगडावरुन जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. 31 जानेवारीपासून अध्यादेश लागू करण्याची मागणी त्यांनी केली असून 10 फेब्रुवारीपासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Jan 30, 2024, 06:23 PM IST

'मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला विरोध कराल तर ओबीसींचं आरक्षणही...' मनोज जरांगेंचा इशारा

Maratha vs OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर मनोज जरांगे पाटील  किल्ले रायगडावर पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावरुन जरांगे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. यावेळी त्यांनी गंभीर इशारा दिलाय.

Jan 30, 2024, 02:52 PM IST

गंभीर! मराठा सर्वेक्षणासाठी गेलेल्या शिक्षकांना मारहाण; कुठं घडली ही धक्कादायक घटना?

Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणाच्या प्रक्रियेला राज्यात सुरुवात झाली असून, अनेक ठिकाणचं काम बहुतांशी पूर्ण झाल्याचं चित्र आहे. 

 

Jan 30, 2024, 09:09 AM IST

मराठा सर्वेक्षणासाठी गुरुजींमुळं विद्यार्थ्यांची गावभर पायपीट; पोट्टे वर्गात कमी वर्गाबाहेर जास्त

Maratha Reservation Survey : राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणुन राज्यभर आंदोलन सुरु होती. आता मराठा यांची नोंद कुठे आहे याची तपासणी करण्यासाठी आता शिक्षकांना विद्यार्थ्यांचा हातभार लागत आहे. 

 

Jan 30, 2024, 08:36 AM IST

मराठा कुणबीमध्‍ये समाविष्‍ट होऊन आरक्षण घेणार नाही; पत्रकार परिषद रद्द झाली तरी नारायण राणे भूमिकेवर ठाम

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी विरोध केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं राणेंनी म्हटलंय. यामध्ये ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो असंही राणेंनी म्हंटलंय.  

Jan 29, 2024, 03:40 PM IST

Maratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, 'मी चुकून...'

Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आंदोलन (Maratha Reservation) स्थगित केलेलं नाही. माझ्या तोंडून चुकून स्थगित शब्द निघाल्याचा दावा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. तसंच गरज लागल्यास पुन्हा मुंबईत धडकू असाही इशारा त्यांनी दिला आहे. 

 

Jan 27, 2024, 10:06 AM IST