16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार?

Maratha Reservation Latest News: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असतानाच सरकार एक दिवसाचे अधिवेशन बोलवणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 12, 2024, 01:15 PM IST
16 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन, मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेणार? title=
maharashtra news Special session likely to held for Maratha reservation on 16 feb

Maratha Reservation News: मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीवर ठाम आहेत. 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन मराठा समाजाने केले आहे. मराठा आरक्षण कायद्यासाठी बंदंच अवाहन केले जातेय. मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पेटला असताना सरकार विशेष अधिवेशन बोलवणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. 16 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवलं जाणार आहे. 

16 फेब्रुवारीला एक दिवसाचे अधिवेशन बोलवले जाणार आहे. त्याआधी मंगळवार किंवा बुधवारी राज्य मंत्री मंडळाची बैठक घेऊन अहवालाला मंजुरी देण्यात येईल. तसंच, आत्तापर्यंत केलेल्या सर्वेक्षणाचे सादरीकरण करण्यात येईल, मराठा समाज माागासवर्गीय आहे. याचे पुरावे देण्यात येतील, अशी माहिती कळतेय. तसंच, अधिवेशनात मराठा मागास अहवाल मंजूरी देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे 9 मागण्या केल्या आहेत. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय. जरांगे उपोषणादरम्यान पाणी आणि औषधोपचार घेत नसल्यानं त्यांची प्रकृती खालावलीय अशी माहिती समोर येतेय. 

महाराष्ट्र बंदचं अवाहन

सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. 14 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षणाच्या कायद्यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन सकल मराठा समाजाने केलं आहे. सोशल मीडियावर महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं असलं तरी सकल मराठा समाजाकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

मराठा आरक्षणासाठी वेगळा कायदा

मराठा आरक्षणासाठी वेगळा कायदा करण्यात येणार आहे.  15 आणि 16 फेब्रुवारीला मराठा आरक्षणाचा कायदा होईल, अशी मोठी घोषणा भुजबळांनी केली. पुण्यात राष्ट्रवादीच्या युवक मेळाव्यात भुजबळांनी ही घोषणा केली

विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलावलं जाईल असं मला वाटत नाही. मनोज जरांगे जरीस पेटले तर कदाचित सरकारच्या मनात असेल तर सगेसोयरेचा जो जीआर आणण्याचा प्रयत्न केला. तर तो ओबीसी समाजावर अन्याय होईल, असं मला वाटते