अण्णांचा सल्ला, तरुणांनी रस्त्यावर यावं!
जनलोकपालसाठी देशातल्या तरुणांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलयं. जळगावात अण्णांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना अण्णांनी जनलोकपालविषयी आपली भूमिका मांडली.
Mar 28, 2012, 11:46 AM IST'टीम अण्णांचं वक्तव्यं अपमानास्पद'
टीम अण्णाच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात लोकसभेत खासदारांनी आक्रमक होत गोंधळ घातला. जेडीयु नेते यांनी लोकसभेत नोटीस बजावल्यानंतर लोकसभेत या विषयावर सर्व एकत्र आले आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्यं अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. मांडण्यात आलेल्या ठरावावर आता चर्चा सुरू झाली आहे.
Mar 27, 2012, 06:26 PM ISTटीम अण्णांविरोधात लोकसभेत ठराव
संसदेतील सर्व राजकीय पक्षाचे सदस्य एकत्र येऊन आज संसदेत टीम अण्णांविरोधात ठराव मांडणार आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्ये अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना एक प्रकारे कोंडीत पकडण्याचा हा डाव असल्याचा आरोप अण्णा समर्थकांतून करण्यात येत आहे.
Mar 27, 2012, 11:21 AM ISTराळेगणसिध्दीत आज आंदोलनाची दिशा
टीम अण्णामधील सदस्य अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटणार आहेत. यावेळी पुढील आंदोलनाची काय दिशा असावी याबाबत राळेगणसिध्दीत चर्चा होणार असल्याची माहिती टीम अण्णामधील दत्ता तिवारी यांनी दिली.
Jan 10, 2012, 10:41 AM ISTअण्णांनी उपोषण सोडले, लढाई मात्र सुरूच!
सशक्त लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी एमएमआरडीए मैदानावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारे यांनी प्रकृती अस्वास्थ आणि संसदेतील विदारक चित्र पाहून बुधवारी सायंकाळी आपले उपोषण सोडले. मात्र, भ्रष्टाचार विरोधातील लढाई सुरूच ठेवणार असल्याचे अण्णा यांनी स्पष्ट केले.
Dec 28, 2011, 07:44 PM ISTलोकपालसाठी मुंबई अण्णामय
अण्णांना समर्थन देण्यासाठी रणमैदानावर देशाच्या कानाकोप-यातून लोक जमा होतायत. यामध्ये बच्चे कंपनीही मागे नाही. जुहूतून महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरूवात झाली. जुहूतून अण्णा हजारे यांची ट्रकमधून रॅली सुरू झाल्यानंतर प्रचंड जनसमुदाय जमला होता.
Dec 27, 2011, 04:40 PM ISTआंदोलन कुठल्याही पक्षा विरोधात नाही – अण्णा
आंदोलन कुठल्याही पक्ष, व्यक्ती विरोधात नाही. तर भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन आहे. आज भ्रष्टाचाराने देशात थैमान घातले आहे. सामान्य माणसाला जीवन जगण कठीण झाले आहे, त्यामुळे आता मुंबईतील तीन दिवसांच्या आंदोलनानंतर दिल्लीत सोनिया गांधींच्या घरासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे स्पष्ट केले.
Dec 26, 2011, 04:53 PM IST'जनलोकपाल'साठी अण्णांचे हाल
अण्णा हजारे आज मुंबईत येणार आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचं उद्यापासून मुंबईत उपोषण होत आहे. मात्र, मुंबईत येण्यापूर्वी अण्णा आळंदीला जाणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.
Dec 26, 2011, 11:22 AM ISTटीम अण्णांनी आंदोलनाचं 'मैदान' मारलं
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण मुंबईतल्या MMRDA मैदानावर २७ ते २९ डिसेंबर पर्यंत होणार आहे. टीम अण्णांनी २६ ते ३० या कालावधीत मैदान बुक केल आहे.
Dec 24, 2011, 02:26 PM ISTअण्णांचा सरकारला निर्वाणीचा इशारा
मुंबईत उपोषणाला जागा दिली नाही तर जेलमध्ये उपोषणाला बसणार असा निर्वाणीचा इशारा अण्णांनी सरकारला दिलाय. सरकार हेतूपुरस्सर उपोषणाच्या मार्गात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप अण्णांनी केलाय.
Dec 23, 2011, 01:46 PM ISTकेंद्र सरकारवर अण्णांची लोकपाल तोफ
केंद्र सरकारचा ड्राफ्ट आम्हांला मंजूर नाही. सक्षम लोकपाल बिल येत नाही तोपर्यंत यांच्याविरोधी आवाज उठवणारच आहे, असा ईशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
Dec 10, 2011, 02:35 PM ISTसरकारची नियत साफ नाही – अण्णा हजारे
सरकारची जनलोकपालबाबत नियत साफ नाही असा घणाघाती आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केला. राळेगणसिद्धी इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सरकार जनलोकपालबाबत चालढकल करत आहे. सिटीझन चार्टरसाठी वेगळ्या कायद्याची गरज काय असा सवालही अण्णांनी केला.
Nov 30, 2011, 01:16 PM ISTअण्णा फॅसिस्ट - डॉ. भालचंद्र मुणगेकर
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची मी म्हणेल तोच कायदा ही भूमिका अयोग्य असल्याचं मत खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकरांनी व्यक्त केलं आहे.
Nov 27, 2011, 06:28 AM ISTक्लास वन, टू लोकपालाच्या कक्षेत
फक्त क्लास वन आणि क्लास टू याच सरकारी अधिका-यांना लोकपालच्या कक्षेत आणलं जाण्याची शक्यता आहे.
Nov 15, 2011, 06:43 AM ISTभ्रष्टाचाराविरोधात लढा सुरूच - अण्णा
लोकपाल कायद्याचे तुकडे करत असल्याने सशक्त जनलोकपाल आणण्यासाठी आंदोलन सुरूच राहील, असं अण्णा हजारेंनी आज पहिल्यांदाच संवाद साधताना सांगितलं.
Nov 4, 2011, 10:25 AM IST