'जनलोकपाल'साठी अण्णांचे हाल

अण्णा हजारे आज मुंबईत येणार आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचं उद्यापासून मुंबईत उपोषण होत आहे. मात्र, मुंबईत येण्यापूर्वी अण्णा आळंदीला जाणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.

Updated: Dec 26, 2011, 11:22 AM IST

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी

अण्णा हजारे आज मुंबईत येणार आहेत. जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांचं उद्यापासून मुंबईत उपोषण होत आहे. मात्र, मुंबईत येण्यापूर्वी अण्णा आळंदीला जाणार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.
अण्णांना व्हायरल फीव्हर झाला असून अशा परिस्थितीत उपोषण करणं तब्बेतीसाठी हानिकारक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं होतं. पण, आता त्यांची तब्येत बरी असल्याचं सांगण्यात येत आहे. अण्णा मात्र तरीही आपल्या उपोषणावर ठाम आहेत.

उद्यापासून अण्णांचं मुंबईतील एमएमआरडीए मैदानात उपोषण सुरू होणार आहे. यासाठी मैदानात सर्व व्यवस्था करण्यात येत आहे. मैदानावर सुमारे ६०,००० आंदोलकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसंच अडीच हजार पोलीस तैनात केले आहेत.