राळेगणसिध्दीत आज आंदोलनाची दिशा

टीम अण्णामधील सदस्य अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटणार आहेत. यावेळी पुढील आंदोलनाची काय दिशा असावी याबाबत राळेगणसिध्दीत चर्चा होणार असल्याची माहिती टीम अण्णामधील दत्ता तिवारी यांनी दिली.

Updated: Jan 10, 2012, 10:41 AM IST

www.24taas.com, मुंबई/गाजियाबाद

 

 

टीम अण्णामधील सदस्य अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटणार आहेत. यावेळी पुढील आंदोलनाची काय दिशा असावी याबाबत राळेगणसिध्दीत चर्चा होणार असल्याची माहिती टीम अण्णामधील दत्ता तिवारी यांनी दिली.

 

 

अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण आज अण्णा हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी राळेगणसिध्दीत जात आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रचार करायचा की नाही तसेत जनलोकपालबाबत पुढील आंदोलनाची रणनिती काय असेल, यावर टीम अण्णांची सदस्य समिती विचार करेल. याबाबतचे माहिती अण्णा हजारे यांना दिली जाणार आहे. त्यानंतर अण्णा हजारे सर्व माहिती देतील, अशी माहिती तिवारी यांनी दिली.

 

 

अण्णांना भेटायच्या आधी गाजियाबाद येथे टीम अण्णा कोर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत भ्रष्टाचार आंदोलनाबाबत चर्चा झाली. याच  भ्रष्टाचार आंदोलनाच्यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात काही बोलायचे नाही तसेच भ्रष्टाचाराचे टार्गेट करायचा नाही, असं बैठकीत ठरलं आहे. मात्र, याबाबतचा निर्णय अण्णांवर सोपविण्यात आला आहे.

 

 

समाजसेविका मेधा पाटकर यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही एकाच राजकीय पक्षाला टार्गेट करणे चुकीचे आहे. मेधा पाटकर यांनी सुचविलेल्या या निर्णया विचार केला गेला आहे. पाटकर या बैठकीला उपस्थित नव्हत्या. मात्र, त्यांनी पत्र पाठविले होते, अशी माहिती तिवारी यांनी दिली.