सरकारची नियत साफ नाही – अण्णा हजारे

सरकारची जनलोकपालबाबत नियत साफ नाही असा घणाघाती आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केला. राळेगणसिद्धी इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सरकार जनलोकपालबाबत चालढकल करत आहे. सिटीझन चार्टरसाठी वेगळ्या कायद्याची गरज काय असा सवालही अण्णांनी केला.

Updated: Nov 30, 2011, 01:16 PM IST

झी २४ तास बेव टीम, राळेगणसिद्धी
सरकारची जनलोकपालबाबत नियत साफ नाही असा घणाघाती आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी केला.  राळेगणसिद्धी इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सरकार जनलोकपालबाबत चालढकल करत आहे. सिटीझन चार्टरसाठी वेगळ्या कायद्याची गरज काय असा सवालही अण्णांनी केला. जनलोकपाल बिल संमत करण्यासाठी सरकारला २२ डिसेंबरपर्यंत मुदत अण्णांनी दिली आहे. त्यानंतर २७ डिसेंबर पासून पुन्हा आंदोलनाला सुरवात करू असा इशारा अण्णांनी दिला आहे. सरकारने लोकपाल बिल संमत केलं नाही तर पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सरकारविरोधात प्रचार करण्याचा इशाराही अण्णा यांनी यावेळी दिला.

 

अण्णांनी रिटेल क्षेत्रातील परदेशी गुंतवणुकीला विरोध केला आहे. इंग्रजही व्यापारासाठी आले आणि राज्य करुन गेले. आता या परदेशी कंपन्या भारतीय लोकांची सेवा करण्यासाठी नव्हे तर मेवा खाण्यासाठी येत असल्याचं अण्णा म्हणाले. रिटेलमध्ये परदेशी गुंतवणुकीमुळे शेतकऱ्यांचे भलं होईल याचा समाचार घेताना अण्णा म्हणाले की ग्रामीण भागात आम्ही आमच्या कामातून परिवर्तन घडवता येतं हे दाखवून दिलं आहे. सरकारने रिटेलमधील थेट परदेशी गुंतवणुकीबाबत पुनर्विचार करावा असं अण्णा म्हणाले.

आंदोलनात स्वामी अग्निवेश सहभागी होणार नसल्याबद्दल विचारलं असता ते सोबत नसले तरी चालतील असं अण्णांनी सांगितलं.

गांधींशी तुलना करू नका!

माझी गांधींबरोबर तुलना करून नका, मी जेव्हा गांधींकडे पाहतो त्यावेळी मी शिवाजी महाराजांकडेही पाहतो, परंतु, असे नाही की मी हिंसा करेल, असेही अण्णा यांनी स्पष्ट केले.