india vs australia

तिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली

ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. 

Dec 30, 2014, 01:44 PM IST

ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमची सुरक्षा वाढविली

सिडनी शहरात एका कॅफेमध्ये बंदूकधारी व्यक्तीकडून काही नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडल्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Dec 15, 2014, 12:35 PM IST

अॅडलेड टेस्टमध्ये कोहलीनं रचला इतिहास!

अॅडलेड टेस्टमध्ये विराट कोहलीनं आपल्या टेस्ट करिअरमधलं सातवं शतक ठोकलंय. कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळताना विराटनं दुसरं शतक ठोकून इतिहास रचलाय.

Dec 13, 2014, 11:49 AM IST

अॅडलेड टेस्ट: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ६ विकेट ३५४

अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ६ विकेट गमावत ३५४ रन्स केलेत. संघसहकारी फिल ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. डेव्हिड वॉर्नर(१४५), क्लार्क (नाबाद ६०) आणि स्मिथ (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत आहे.

Dec 9, 2014, 02:35 PM IST

ह्युजच्या निधनामुळं भारतासोबतच्या पहिल्या टेस्टवर अनिश्चिततेचे ढग

फिलिप ह्युजच्या निधनानंतर खेळाडू आजूनही शोकाकुल स्थितीत आहे आणि अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या पहिल्या टेस्ट मॅचवर अनिश्चिततेचे ढग आहेत. पहिली टेस्ट चार डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि त्यासाठी आठवड्याहून कमी कालावधी शिल्लक आहे. 

Nov 29, 2014, 07:58 AM IST

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडिया जाहीर, पहिली टेस्ट धोनी विनाच!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टेस्ट सीरिजसाठी आज टीम इंडियाची निवड करण्यात आली असून महेंद्रसिंह धोनीला दुखापतीनं ग्रासल्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचला धोनीला विश्रांती देण्यात आली आहे. या सामन्यात विराट कोहली भारतीय टीमचं नेतृत्व करणार असून सुरेश रैनानं तब्बल दोन वर्षांनी भारताच्या टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलं आहे. तर के. एल. राहुल आणि कर्ण सर्मा या नवीन चेहऱ्यांना ऑस्ट्रेलियाचे तिकीट मिळालं आहे. 

Nov 10, 2014, 04:35 PM IST

कोहलीची ‘विराट’ कामगिरी, आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल!

विराट कोहलीनं आयसीसीच्या वन-डे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाला मागं टाकत अव्वल क्रमांक पटकावला आहे. उद्या म्हणजे ५ नोव्हेंबरला कोहलीचा वाढदिवस आहे. योगायोगानं त्याआधीच त्याला बर्थडे गिफ्ट मिळालंय.

Nov 4, 2013, 09:03 AM IST

सचिन-सेहवागनंतर... रोहीतची डबल सेन्चुरी!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे श्रृंखलेच्या सातव्या मॅचमध्ये रोहीत शर्माची तुफानी खेळी क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळाली. शनिवारी, खेळताना सिक्स आणि फोरची बरसात करत रोहितनं डबल सेन्चुरी ठोकलीय.

Nov 2, 2013, 06:10 PM IST

कोहलीच्या ‘विराट’ खेळीनं टीम इंडियानं गाठलं ‘शिखर’!

टीम इंडियानं पुन्हा एकदा आपला लढाऊ बाणा दाखवत अतिशय अटीतटीच्या मॅचमध्ये कांगारूंचा ६ विकेट्स आणि ३ बॉल्स राखून पराभव करत दणदणीत विजयाची नोंद केली आणि सीरिजमध्ये बरोबरी साधली. टीम इंडियाच्या या अतिशय रोमहर्षक विजयाचा शिल्पकार ठरला तो सेंच्युरियन विराट कोहली आणि शिखर धवन.

Oct 31, 2013, 10:30 AM IST

सहाव्या वन डेसाठी टीम इंडिया सज्ज!

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमधल्या वन डे सीरिजचा आज सहावी मॅच नागपूरमध्ये होणार आहे.सात सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ अशी आघाडी घेतलीय. चौथी आणि पाचवी वन-डे मॅच पावसामुळं रद्द झाल्यानं भारताला आता ही सीरिज जिंकण्यासाठी पुढच्या दोन्ही मॅच जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळं ही मॅच म्हणजे टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ची स्थिती आहे.

Oct 30, 2013, 09:08 AM IST

रांचीमध्ये धोनीच्या घरावर दगडफेक!

टीम इंडियाचा कप्तान याच्या होमटाऊनवर असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या वन-डेवर पावसानं पाणी फिरवलं. पावसामुळं मॅच रद्द झाल्यानंतर धोनीच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केला गेलाय. या दगडफेकीत धोनीच्या घराचे काच फुटल्याची माहिती मिळतेय. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावेळी धोनीच्या कुटुंबातलं कोणीही घरी उपस्थित नव्हतं.

Oct 24, 2013, 10:50 AM IST

भारत ऑस्ट्रेलिया चौथी वन-डे आज रांचीत रंगणार

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे रांचीमध्ये रंगणार आहे. भारताला या सीरिजमध्ये कमबॅकचं आव्हान असणार आहे. भारत सीरिजमध्ये १-२ नं पिछाडीवर आहे. मॅचममध्ये भारताला कमकबॅकचं आव्हान असणार आहे. रांचीमध्ये मॅच होणार असल्यानं कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीकडे सा-यांचच लक्ष असणार आहे.

Oct 23, 2013, 08:59 AM IST

रांची वनडेमध्ये भारतावर दबाव

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी वन-डे रांचीमध्ये रंगणार आहे. भारताला या सीरिजमध्ये कमबॅकचं आव्हान असणार आहे. भारत सीरिजमध्ये 1-2 नं पिछाडीवर आहे.

Oct 22, 2013, 09:13 PM IST