रांचीमध्ये धोनीच्या घरावर दगडफेक!

टीम इंडियाचा कप्तान याच्या होमटाऊनवर असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या वन-डेवर पावसानं पाणी फिरवलं. पावसामुळं मॅच रद्द झाल्यानंतर धोनीच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केला गेलाय. या दगडफेकीत धोनीच्या घराचे काच फुटल्याची माहिती मिळतेय. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावेळी धोनीच्या कुटुंबातलं कोणीही घरी उपस्थित नव्हतं.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 24, 2013, 10:50 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, रांची
टीम इंडियाचा कप्तान याच्या होमटाऊनवर असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या वन-डेवर पावसानं पाणी फिरवलं. पावसामुळं मॅच रद्द झाल्यानंतर धोनीच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केला गेलाय. या दगडफेकीत धोनीच्या घराचे काच फुटल्याची माहिती मिळतेय. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यावेळी धोनीच्या कुटुंबातलं कोणीही घरी उपस्थित नव्हतं.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धोनीचे कुटुंबिय जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर चौथी वन-डे मॅच बघण्यासाठी गेले होते. दगडफेक कोणी केली हे कळलं नसून कोणीही साक्षीदार पुढं आलेला नाहीय. धोनीचं घर रांचीतल्या हरमू हाऊसिंग कॉलनीत आहे. मॅचच्या परिणामाचा या दगडफेकीची संबंध नसल्याचं धोनीचे कुटुंबिय म्हणाले.
धोनीच्या बहिणीचे पती गौतम गुप्ता म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेज बघितल्या शिवाय कोणावरही आरोप करणार नाही. सीसीटीव्ही फुटेज बघितल्यानंतर घटनेची एफआयआर नोंदवल्या जाईल. गुप्ता यांनी जिल्हा प्रशासनाकडे सुरक्षेसंबंधी लक्ष देण्याची विनंती केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.